
प्रतिनिधी – पुणे
याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, राज्य शासनाने 1989 साली विमुक्त भटक्या जमातीकरीता 70 कुटुंबाना मुंढवा पुणे येथील क्षेत्राचे वाटप करण्यात आले होते. त्यापैकी फिर्यादी शशिकांत गोपीनाथ गायकवाड यांची आजी नामे श्रीमती मल्लावा यमणाप्पा गायकवाड (सध्या मयत) रा- केशवनगर, मुढवा, पुणे याना मौजे मुंढवा ता-पुणे शहर, जि- पुणे येथील जमीन सर्वे न 9 ते 14 हीस्सा क्र 1/1 क्षेत्र 0 हे 79 आर हा क्षेत्राचे वाटप करण्यात आले होते. त्यांनतर फिर्यादी यांचे आजीने सदर जमीनीची नवीन अविभाज्य शर्तीवर भोगवटादार वर्ग-02 म्हणुन धारण केलेले मौजे मुढवा ता-पुणे शहर जि-पुणे येथील जमीन सर्वे न 9 ते 14 हीस्सा क्र 1/1 क्षेत्र 0 हे 79 आर हे क्षेत्र शासन निर्यण क्र मह-2/ जमीन /पुणे/ सीआर/5647-अ आयुक्त पुणे विभाग पुणे यांचे कार्यालय विधान भवन पुणे 05 दि 31/12/2007 अन्वये श्री प्रमोद मिश्रीलाल धाडीवाल मुख्य प्रर्वतक शरद सहकारी गृहरचना संस्था पुणे यांना अकृषीक प्रयोजनासाठी विक्री करण्यास अर्टी शर्तीवर परवानगी देण्यात आली होती.
सदर बाबत खरेदीखत हे दि 03/01/2008 रोजी हवेली क्र- 11 चे सह दुय्यम निबंधक वर्ग- 02 यांच्या कार्यालात सर्वे न 9 ते 14 हीस्सा क्र 1/1 क्षेत्र 0 हे 79 आर चे दस्त क्र 131/2008 अन्वये खरेदीखत तयार करण्यात आले असुन यात लिहुन देणार 1 मल्लावा यमणाप्पा गायकवाड (सध्या मयत) रा केशवनगर मुढवा पुणे 2. गंगुबाई तुकाराम जाधव वय 60 वर्षे 3. प्रभाबाई परशुराम जाधव वय 55 वर्षे 4. गोपीनाथ यमुनाप्पा गायकवाड वय 50 वर्षे 5. सुशीलाबाई कैलास वय 45 वर्षे 6. सुलोचनाबाई सुनिल जाधव वय 42 वर्षे 7 सुनिता मारुती पात्रुट वय 37 वर्षे 8. कल्पना गोपीनाथ गायकवाड वय 40 वर्षे 9. श्रीकांत गोपीनाथ गायकवाड वय 24 वर्षे 10. अशीष गोपीनाथ गायकवाड वय 22 वर्षे 11. हेमंत गोपीनाथ गायकवाड वय 20 वर्षे 12. शशीकांत गोपीनाथ गायकवाड वय 18 वर्षे 13. खरेदीखतास मान्यता देणार ऋतीक टेक्नोलॉजी अँड रियालिटी प्रा लि तर्फे प्रमोद मिश्रीलाल धाडीवाल व लिहून घेणार 1. शरद सहकारी गृहरचना संस्था मर्या तर्फे चेअरमन प्रमोद मिश्रीलाल धाडीवाल 2. शरद सहकारी गृहरचना संस्था मर्या तर्फे सेक्रेटरी – रमेश मिश्रीलाल धाडीवाल याना वरील खरेदी खताने सदारची मिळकत दोन कोटी रु विक्री करण्यात आली होती. सदरचा मोबदला वरील लिहून देणार यांच्या वेगवेगळा बँक खात्यात जमा करण्यात आली होती परंतु फिर्यादी यांना कोणताही मोबदला दिला नाही.
तरी वरील प्रमाणे खरेदीखत बनविताना हवेली क्र- ११ चे सह दुय्यम निबंधक वर्ग 02 यांच्या कार्यालयात सर्व कुटुंबासोबत सह हजर होतो, त्यानंतर फिर्यादी यांनी 2016 साली रेल्वेमध्ये नोकरी लागल्याने घरातील कागदपत्राकडे पाहिले नाही. मात्र 2022 साली फिर्यादी घरी असताना जुन्या कपाटात सदरचे खरेदीखत सापडले. त्यावेळी सदर खरेदीखतात दस्त नोंदणी करताना फिर्यादीचे वय हे 18 वर्षे पुणे दखविण्यात आले होते व सदर दस्तास मान्यता देणारे व सदर दस्त हजर करणारे म्हणुन प्रमोद मिश्रीलाल धाडीवाल यांनी स्वाक्षरी केल्या. सदरचा दस्त नोंदविलेल्या दिवशी फिर्यादीचे वय हे 16 वर्षे असल्याचे दिसुन आले. त्यानंतर फिर्यादीने प्रथम तक्रार ही दि 17/11/2022 रोजी सह जिल्हा निबंधक वर्ग 01 येथील कार्यालयात केली होती. फिर्यादीचे आधार कार्ड पॅन कार्ड ची पडताळणी करुन वय चेक केले असता फिर्यादी यांची जन्म तारीख ही 19/06/1991 आशी होती व फिर्यादीच्या जन्म तारखेची व्यवस्थीत पडताळणी केली असता खरेदी खतावेळी म्हणजे दि 03/01/2008 रोजी हवेली क्र 11 चे सह दुय्यम निबंधक वर्ग 02 येथे दस्त नोदणी कार्यलयात दस्त नोदणी करते वेळी फिर्यादीचे वय हे वर्षे 18 वर्षे पुर्ण झाल्याचे चुकीचे नमुद करुन प्रमोद मिश्राधाडीवाल यांनी सदर दस्त त्याचे स्वस्वाक्षरीने सादर केल्याचे समजले. सदर दस्त नोदणी करतेवेळी फिर्यादीचे वय हे 16 वर्षे 06 महीने 15 दिवस असे होते. पण नोदंणी अधिकारी यांना फिर्यादीचे वय हे 18 वर्षे पूर्ण झाल्याचे दाखवुन चुकीचा दस्त बनवुन नोंदणी करण्यात आला.
त्यानंतर मा. सह जिल्हा निबंधक वर्ग 01 व मुद्रांक जिल्हाधिकारी पुणे शहर यांना फिर्यादीने केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने वरील दोन्ही कार्यालयाकडील दि 21/04/2025 रोजीच्या प्राप्त निर्देशानुसार सदर नोंदणीकत खरेदीखत दस्त क्र 131/2008 मधील संबधीताविरुध्द कायदेशीर कारवाई होणेबाबत दुय्यम निबंधक हवेली-11 यांना कळविण्यात आले आहे.
तरी दिनांक 03/01/2008 रोजी कार्यालयीन वेळेत मा. दुय्यम निबंधक हवेली-11 येथे दस्त क्रमांक 131/2008 हा नोंदविताना माझे वय 16 वर्षे 06 महीने 15 दिवस असताना लिहून देणार मध्ये अनु.क्र. 12 मध्ये फिर्यादीचे नाव टाकुन वय 18 वर्षे असल्याचे नमुद करुन रजिस्ट्रार यांचेसमक्ष संगणमताने स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता वया बाबतचे खोटे विधान करुन वरीलप्रमाणे दस्त नोंदविला आहे असे फिर्यादी शशिकांत गोपीनाथ गायकवाड यांनी बंडगार्डन पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारी अर्जात नमूद केले असून त्यानुसार पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास बंडगार्डन पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण हे करत आहेत.