जाहिरात
WhatsApp Image 2025-06-01 at 7.03.37 PM (1)

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरी मुलगी पहाटेच गेली पळून

प्रतिनिधी – राजगुरुनगर

लाखो रुपये घेऊन मध्यस्थींनी जुळविले लग्न, मात्र लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरी मुलगी व मुलीची मामी पहाटे ५:३० वाजता झाली पसार नवरदेवाचे कुटुंबाचे फसवणूक झाल्याचे लक्षात आले असता या बाबत मध्यस्थी १) ज्योती संतोश तांबोळी रा. वडगाव सहाणी ता. जुन्नर जि. पुणे २) सुवर्णा उत्तम गव्हाणे रा.उमरगा ता. उमरगा जि. उस्मानाबाद ३) अनुसया राजेंद्र मोरे रा.उमरगा ता.उमरगा जि. उस्मानाबाद ४) मनीषा बाळु कदम रा. यशवंत कॉलनी, निलंगा ता. निलंगा जि. लातुर यांचे विरुध्द कायदेशीर तक्रार मुलाचे वडील आनंदा सयाजी जैद रा.जैदवाडी यांनी खेड पोलीस ठाण्यात देऊन फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

या बाबत मिळालेली माहिती अशी की, दिनांक 22/04/2025 रोजी दुपारी 02.00 वा.चे सुमारास फिर्यादी आनंदा जैद यांना आरोपी ज्योती संतोश तांबोळी रा. वडगाव सहानी ता. जुन्नर जि.पुणे यांनी फोन केला आणि विचारले कि, तुमचा मुलगा स्वप्नील याचे करीता मुलगी पाहीली आहे. तुमची इच्छा असेल तर मुलगी दाखवते तसेच मुलीला आई वडील नसुन ते उमरगा ता.उमरगा जि. उस्मानाबाद येथे तिचे मावशी मनीशा बाळु कदम व मामी अनुसया राजेंद्र मोरे रा. सदर यांचेसोबत राहण्यास आहे.

त्यानंतर फिर्यादी  यांना व त्यांचे घरच्यांना मुलीचे फोटो दाखविले. आम्हाला मुलगी पसंद असलेचे सांगीतलेनंतर ज्योती तांबोळी यांनी मुलीला घेवुन येते असे सांगीतले. त्यांनतर दुस-या दिवशी दिनांक 23/04/2025 रोजी सकाळी 11.00 वा.चे सुमारास ज्योती तांबोळी ही तिचे पती संतोश तांबोळी, मुलगी सुवर्णा उत्तम गव्हाणे मुलीची मावशी मनीषा कदम व मामी अनुसया मोरे असे आमचे घरी आले. त्यानंतर मुला मुलीचे पाहण्याचा कार्यक्रम होऊन, मानपानचा विषय झाला.

त्यामध्ये लग्न करून देणार ज्योती तांबोळी यांना दीड लाख रुपये देण्याचे ठरले व लग्न रजिस्टर करून जो काय खर्च होईल तो मुलाचे घरच्यांनी करायचे असे ठरले. या अगोदर ज्योती तांबोळी यांना मुलीला घेवून येण्याकरीता 20 हजार रुपये दिले होते. त्याप्रमाणे बोलनी चालनी झाल्यानंतर ज्योती तांबोळी यांनी सांगितले कि, उशीर कशाला करायचा आजच लग्न लावून देवू असे आमचेत ठरले. म्हणून आम्ही याच दिवशी आळंदी येथे सायंकाळी 07.00 वा.चे सुमारास न्यू इंद्रायणी मंगल कार्यालयात जावुन लग्न केले. त्या ठिकाणी ज्योती तांबोळी यांनी ठरलेले दीड लाख रुपयाची मागणी केली असता फिर्यादी यांनी उद्या देतो असे सांगीतले. परंतु त्यांनी फिर्यादीचे काहीएक ऐकून न घेता आत्ताचे आता पैसे दया असे सांगीतले. लग्नात गोंधळ नको म्हणून आम्ही ज्योती तांबोळी हिला आनलाईन व कॅश असे एक लाख दहा हजार रूपये दिले.

त्यानंतर लग्नाचा सर्व विधी पार पाडला आणि आम्ही मुलीला घेवुन घरी आलो. त्यावेळी ज्योती तांबोळी व तिचा नवरा संतोष  तांबोळी तसेच मुलीची मामी हे देखील होते. व मुलीचे मावशी मुलीचा मावस भाऊ व त्यांचा ड्रायव्हर असे आळंदी येथून त्याचे घरी उमरगा येथे निघुन गेले.

त्यांनतर फिर्यादी हे घरी आल्यानंतर सर्व विधी लग्नाचे सर्व धार्मीक कार्यक्रम पार पाडला. त्यानंतर रात्री जेवण वगैरे करून रात्री 12.00 वा.चे सुमारास दि. 24/04/2025 रोजी पहाटे 03.00 वा.चे सुमारस आम्ही दमलो होतो त्यामुळे सार्वजन हॉलमध्ये झोपलो होतो. मात्र पहाटे 05.30 वा.चे सुमारास फिर्यादी यांची पत्नी यांना जाग आलेनंतर त्यांनी पहिले कि, नवरी मुलगी व मुलीची मामी हे हॉलमध्ये कुठेहि दिसून आले नाही. त्यानंतर फिर्यादी यांचे पत्नीने आम्हा सर्वाना झोपेतून उठवले त्यानंतर आम्ही सदर मुलीचा व मामीचा शोध घेतला असता ते कोठेही मिळूण आले नाही. त्यानंतर फिर्यादी यांनी तांबोळी यांना स्वतः फोन करून झालेला सर्व प्रकार सांगीतला व घरी बोलावुन घेतले. त्यानंतर ज्योती तांबोळी आमचे घरी आले व त्यांनी दोन ते तीन जनांना फोन लावले व मुलीबाबत व मुलीचे मामीबाबत चौकशी केली. व फिर्यादी व त्यांचे कुटुंबाला सांगीतले कि, मुलगी व मामी हे त्यांचे घरी देखील पोहचलेले नाहीत.

मात्र फिर्यादी व त्यांचे कुटुंबातील सर्व जण यांचे लक्षात आले कि, तांबोळी व त्यांचे सहकारी यांनी संगणमत करून लग्नाकरीता फिर्यादी यांचे कडून 1 लाख 60 हजार रुपये घेवुन घाईघाईने मुलाचे लग्न सदर मुलीसोबत लावुन दिले. व आम्हाला लग्नात नाहक खर्च करून लबाडीचे इराद्याने, आर्थिक फसवणुक करून फिर्यादी यांचे कडुन घेतलेले पैसे परत दिले नाही व फसवणुक केली आहे. असे फिर्यादिने तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणायत आला असून सदर घटनेचा पुढील तपास खेड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रभाकर मोरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष मोरे हे करत आहेत.

दरम्यान लग्न जुळवणारे मध्यस्थींतर्फे लग्न करत असताना मध्यस्थींना कोणीही पैसे देऊ नये व दोन्हीकडच्या बाजूंची सर्व शहानिशा केल्याशिवाय घाई गडबडीने लग्न करू नये.

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. तालुक्यात अशा अनेक घटना घडतात त्याला कायद्याने वाचा फोडणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!