जाहिरात
WhatsApp Image 2025-06-01 at 7.03.37 PM (1)

महीला व मुली ठेवून अवैध वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या लॉजवर मंचर पोलिसांची धाड

अवसरीफाटया जवळील शिवांश लॉज येथे महीला व मुली ठेवून अवैध वेशाव्यवसाय चालू आहे अशी माहिती गुप्त बातमीदारा मार्फत पोलिसांना मिळाली, पोलिसांनी लगेचच डमी गिऱ्हाईक पाठवून सत्यता तपासली सदर मिळालेल्या घटनेची माहिती खरी असल्याने सदर शिवांश लॉजवर रेड टाकण्यात आली आणि त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

स्वराज्य संवाद मंचर – प्रतिनिधी

याबाबत पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, दिनांक १२/६/२०२५ रोजी मंचर पोलीस स्टेशन हद्दीत अवसरी खुर्द ता. आंबेगाव जि पुणे येथिल अवसरीफाटया जवळील शिवांश लॉज येथे महीला व मुली ठेवून अवैध वेशाव्यवसाय चालू आहे अशी माहिती गुप्त बातमीदारा मार्फत पोलिसांना मिळाली होती. सदर ठिकाणी रेड करणेकामी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साो खेड विभाग खेड, पुणे ग्रामीण, मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ सो यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर व त्यांचे सोबत पोलीस स्टाफ अशी सदर ठिकाणी रेड करणेकामी टिम नेमण्यात आली होती.

त्याकरीता एक डमी गिऱ्हाईक व दोन पंच यांना मंचर पोलीस ठाण्यात बोलावून घेवून डमी गिऱ्हाईक व पंच यांना योग्य त्या सुचना देवून डमी गि-हाईकास शिवांश लॉज येथे पाठविण्यात आले.

त्यानंतर सहा. पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर, त्यांचे सोबतचे पोलीस पथक, दोन पंच असे शिवांश लॉजचे अलिकडे डमी गि-हाईकाचे इशा-याची वाट पाहत थांबलेले होत. डमी गिऱ्हाईक शिवांश लॉज येथे अवैध वेशा व्यवसाय चालू आहे असे इशारा करून पोलिसांना कळविल्याने शिवांश लॉजमध्ये अचानक छापा टाकला असता शिवांश लॉजमध्ये दोन महीला अवैध व्यवसाया करीता आणले असून त्यांचे मार्फतीने अवैध व्यवसाय चालू असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर दोन्ही महीलांना व हॉटेल चालक कविता राठोड यांना तपासकामी ताब्यात घेण्यात आले आहे. शिवांश लॉज येथे चालू असलेल्या अवैध वेशा व्यवसायाबाबत पोलीस हवालदार संजय नाडेकर यांनी सरकारतर्फे मंचर पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली आहे. त्यावरून गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हयात शिवांज लॉज चालक कविता संतोष राठोड रा. राक्षेवाडी, ता. खेड जि पुणे, मुळ रा. यवतमाळ हिला व तिचा साथिदार यांना गुन्हयात अटक करण्यात आली असून त्यांना मा. न्यायालयात हजर करून गुन्हयाचे तपासकामी तीन दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. संदिपसिंग गिल्ल सो, मा अपर पोलीस अधिक्षक श्री रमेश चोपडे, मा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल मांडवे साो, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ सो, सहा पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर, सहा. पोलीस उपनिरीक्षक राजेश नलावडे, पोलीस हवालदार संजय नाडेकर, पोलीस नाईक संतोष कोकणे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे, पोलीस अंमलदार वाल्मीक कुमावत, महीला पोलीस अंमलदार रेश्मा गाडगे यांनी केली आहे.
दरम्यान आंबेगाव तालुक्यामध्ये असे कुठेही कोणतेही अवैध व्यवसाय कोणी करत असेल तर आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनची संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!