जाहिरात

भीमाशंकर कारखान्याची मोठी घोषणा: गाळप हंगाम २०२६-२७ साठी उसाला प्रतिटन ३,६०० रुपये पहिली उचल जाहीर

मंचर (पुणे) : दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२६-२७ मध्ये गाळप होणाऱ्या कार्यक्षेत्र आणि परिसरातील उसाला प्रति मेट्रिक टन ३,६०० रुपये पहिली उचल देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्याचे सहकार मंत्री व कारखान्याचे संस्थापक-संचालक दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

प्रतिनिधी – दिपाली खिरड

एफआरपीपेक्षा अधिक दर देण्याचा निर्णय

या निर्णयाबाबत अधिक माहिती देताना चेअरमन बाळासाहेब बेंडे म्हणाले की, “भीमाशंकर कारखान्याने कार्यक्षेत्र व परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नेहमीच चांगला बाजारभाव दिला आहे. कारखान्याच्या २०२५-२६ मधील सरासरी साखर उताऱ्यानुसार एफआरपी (FRP) दर ३,२७३.६५ रुपये प्रति मेट्रिक टन इतका येत आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून संचालक मंडळाने यंदाच्या हंगामासाठी एफआरपीपेक्षा जादा दर देण्याचा निर्णय घेतला आहे.”

विभागनिहाय जाहीर केलेले ऊस दर (पहिली उचल):

• कार्यक्षेत्र व परिसर: ३,६०० रुपये प्रति मे. टन

• अहिल्यानगर (नगर) जिल्हा परिसरातून येणारा ऊस: ३,२७४ रुपये प्रति मे. टन

• पैठण व गेवराई परिसरातून येणारा ऊस: ३,१०० रुपये प्रति मे. टन

हंगामातील आतापर्यंतची कामगिरी (दि. २१ नोव्हेंबर अखेर):

कारखान्याचा २०२६-२७ चा गाळप हंगाम अत्यंत वेगाने सुरू असून, उपपदार्थ निर्मितीतही कारखान्याने चांगली आघाडी घेतली आहे.

• ऊस गाळप: २ लाख ७२ हजार मेट्रिक टन

• साखर उत्पादन: २ लाख ८१ हजार क्विंटल (सरासरी साखर उतारा १०.५३%)

• सहवीज निर्मिती: १ कोटी ७६ लाख ५६ हजार युनिट उत्पादन (कारखाना वापर वजा जाता ९० लाख १३ हजार युनिट वीज निर्यात)

• डिस्टिलरी प्रकल्प: ३० लाख ५० हजार बल्क लिटर रेक्टिफाईड स्पिरिटचे उत्पादन

शेतकऱ्यांना सहकार्याचे आवाहन

कारखान्याने यंदाच्या गाळप हंगामाचे अत्यंत काटेकोर नियोजन केले आहे. त्यामुळे सभासद व बिगर सभासद शेतकऱ्यांच्या संपूर्ण उसाचे वेळेत गाळप होण्यास मदत होणार आहे. तरी कार्यक्षेत्र व परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला जास्तीत जास्त ऊस भीमाशंकर कारखान्यास गाळपासाठी पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Most Popular

Recent Comments