जाहिरात
WhatsApp Image 2025-06-01 at 7.03.37 PM (1)

निवासस्थानी स्टोअर रूममध्ये अनाधिकृतपणे 50 लिटर डिझेल साठा सापडला, गुन्हा दाखल

निवासस्थानी स्टोअर रूममध्ये अनाधिकृतपणे ज्वलनशील पेट्रोलिअम पदार्थ ५० लिटर डिझेल साठा सापडला असून आरोपी श्री राजेंद्र श्रीपत कुऱ्हाडे यांचे विरुद्ध आळेफाटा पोलीस स्टेशन येथे फिर्यादी श्रीमती. माधुरी संतोषवार, पुरवठा निरीक्षण अधिकारी रा. घोडेगाव ता. आंबेगाव यांनी चौकशीअंती गुन्हा दाखल केला आहे.

स्वराज्य संवाद प्रतिनिधी – आळेफाटा

याबाबत मिळालेली माहिती अशी की, दिनांक 13/06/2025 रोजी ॲडव्होकेट श्री. विजय कुऱ्हाडे यांनी अनाधिकृत डिझेल विक्री व तस्करी डिझेल, डिझेलचा अनाधिकृत डिझेल टँकर व अनाधिकृत डिझेल साठा यावर तातडीने कार्यवाही करणेबाबत तक्रारी अर्ज मा तहसीलदार जुन्नर यांना सादर केलेला होता. त्याअनुषंगाने मा तहसीलदार यांनी दिनांक 14/06/2025 रोजी आदेश क्र पुरवठा /कावि/140/2025 नुसार तक्रारीच्या अनुषंगाने तपासणी करणेकरिता फिर्यादी यांचे नियंत्रणाखाली तपासणी पथकाची नियुक्ती केली.

त्यानुसार फिर्यादी हे आळेफाटा पोलीस स्टेशन येथे आलेनंतर पोलीस निरिक्षक. दिनेश तायडे सो यांच्या नियंत्रणाखालील पथकाने संबंधित तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही करत असताना अंदाजे 50 लिटर डिझेल ताब्यात घेवुन डिझेल रिपोर्टसह आमच्या ताब्यात दिले. त्यानंतर फिर्यादी यांनी चौकशी केली असता आरोपी श्री. राजेंद्र श्रीपत कुऱ्हाडे यांचे निवासस्थानी स्टोअर रुम मध्ये आढळून आल्याचे तपासात निष्पण्ण झाले. संबंधित आरोपी यांनी ज्वलनशील पेट्रोलिअम पदार्थ निवासस्थानी ठेवण्यास प्रतिबंध असताना देखील अंदाजे 50 लिटर डिझेलची साठवणुन त्यांचे निवासस्थानातील स्टोअर रुम मध्ये साठवुन ठेवल्याचे पोलीस तपासात निदर्शनास आले आहे.

त्यानुसार आरोपीने जीवनावश्यक वस्तु कायदा 1955 च्या कलम 3 नुसार येत असलेल्या मोटार स्पिरीट / हाय स्पीड डिझेल नियंत्रण आदेश 2005 यातील तरतुदीचे तसेच जिवनावश्यक वस्तु कायदा 1955 च्या कलम 7 चे उल्लंघन केल्याचे दिसुन आले आहे.

त्याअनुषंगाने फिर्यादी श्रीमती माधुरी संतोषवार, पुरवठा निरीक्षण अधिकारी यांनी आरोपी नामे श्री राजेंद्र कुऱ्हाडे रा सिद्धीविनायक सोसायटी आळेफाटा ता जुन्नर जि पुणे यांचे विरुद्ध जीवनावश्क वस्तु कायदा 1955 च्या कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तरी पुढील तपास ग्रेड पोसई डुंबरे सो हे करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!