
टोको लॉजि प्रा.लि. या खाजगी कंपनीचे नारायणगाव शाखेत काम करणारे स्वप्निल तानाजी आल्हाट रा.वारुळवाडी, शभसंपदा अपार्टमेंट, ता. जुन्नर, जि. पुणे, किरण नामदेव थोरात, रा. आदेश रेसिडन्सी, पारी कंपनीजवळ, नऱ्हे पुणे व रोहित काशिनाथ पवार, रा. नारायणगाव, खोडद रोड, ता. जुन्नर, जि. पुणे या तिघांन ॲमेझॉन कंपनीकडून आलेले 1,05,906/- रु. किंमतीचे 36 पार्सल (साहित्य) व ग्राहकांचे रोख झालेले 1,06,650/- रु असे एकून 2,12,556/- रूपयांचा कंपणीचे परस्पर अपहार केला म्हणून कंपनीचे मॅनेजर राजदीप विजय वेल्हाळ यांनी नारायणगाव पोलीस स्टेशन येथे केला गुन्हा दाखल.
स्वराज्य संवाद नारायणगाव – प्रतिनिधी
याबाबत घटनेची सविस्तर मिळालेली माहिती अशी की, मागील 03 वर्षापासुन फिर्यादी हे ट्रोको लॉजी प्रा.लि. या कंपनीचे मुख्य कार्यालय नं. 17,18 विघ्नहर बिल्डींग, सुजय गार्डन, मुकुंदनगर, पुणे 411037 येथे नोकरी करत आहेत. कंपनीच्या भारतभर शाखा असुन महाराष्ट्रात एकुण 05 शाखा व 01 मुख्य ऑफिस आहे. फिर्यादी यांची कंपनी ॲमेझॉन कंपनीकडून ग्राहकांनी मागविलेले विविध साहित्य/पार्सल हे त्या संबंधित ग्राहकांपर्यंत सुरक्षित पोहोचवणे व त्या साहित्याचे/पार्सलचे रक्कम संबधित ग्राहकांकडुन घेवुन परत ॲमेझॉन कंपनीला भरण्याचे काम करते. ॲमेझॉन कंपनीकडुन ग्राहकांनी ऑनलाईन पध्दतीने विकत घेतलेले, मागणी केलेले साहित्य, पार्सल हे अमेझॉन कंपनी फिर्यादी काम करत असलेल्या ट्रोको लॉजी प्रा.ली., या कंपनीच्या संबधित शाखेत देते. त्यानंतर फिर्यादी यांची कंपनी त्या सांहित्यांचे, पार्सलचे ग्राहकाच्या पत्यानुसार वर्गीकरण करुन ते ग्राहकांना पुरवते.
नारायणगाव व आजुबाजुच्या गावात सदरची सेवा पुरविण्यासाठी मौजे वारुळवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे येथे सन 2020 पासुन ट्रोको लॉजी प्रा.ली. या कंपनीची एक शाखा चालु करण्यात आली. सदर शाखेची देखभाल व कामकाज पाहण्यासाठी मुख्य शाखेकडून स्वप्नील तानाजी आल्हाट याची स्टेशन मॅनेजर म्हणुन नेमणुक केली असल्यापासुन तो नारायणगाव शाखेचे काम पाहत होता. तसेच सदरच्या शाखेत डिलेव्हरी बॉय म्हणुन 05 ते 06 मुले आहेत. आमच्या कंपनीचे नारायणगाव स्टेशन मध्ये ग्राहकांनी बुकींग केलेल्या व ॲमेझॉन कडुन येणा-या मालाचे ग्राहकापर्यंत पोहोच करण्याची व त्या बदल्यात आलेल्या रोख रक्कमेचे संपूर्ण हिशोब ठेवण्याची व ती रक्कम हाताळण्याची संपूर्ण जबाबदारी स्वप्नील अल्हाट याचेवर होती. तसेच कंपनीच्या विविध शाखेचे ऑपरेशन मॅनेजर म्हणून फिर्यादी यांचे कंपनीकडुन किरण नामदेव थोरात याची आठ महिन्यापुर्वी गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील शाखेत नेमणुक करण्यात आली होती. त्यानंतर फेब्रुवारी 2025 पासुन किरण थोरात याची नारायणगाव शाखेत ऑपरेटर मॅनेजर म्हणुन नेमणुक करण्यात आली आहे. नारायणगाव शाखेतील सर्व कामकाज करण्याचे व सर्व आर्थिक व्यवहार संभाळण्याची संपूर्ण जबाबदारी स्वप्नील आल्हाट व किरण थोरात या दोघांवर होती.
तसेच आमच्या नारायणगाव शाखेत डिलेव्हरी बॉय म्हणुन रोहित काशिनाथ पवार हा जास्तीत जास्त पार्सल ग्राहकांना पोहोचविण्याचा काम करत आहे, नारायणगाव व आसपासच्या गावातील विविध ग्राहकांनी मागणी केलेले व ॲमेझॉन कंपनीकडुन नारायणगावच्या शाखेत आलेले साहित्य/पार्सल हे संबंधित ग्राहकांना पोहोच केल्यानंतर संबधित ग्राहकांकडुन आलेली रक्कम ही ॲमेझॉन कंपनीस दुसऱ्या दिवशी भरणा करण्याचे काम स्वप्निल आल्हाट व किरण थोरात हे करत असत.दिनांक 14/06/2025 रोजी मी आमच्या कंपनीचे वडगाव शेरी शाखेचे स्टेशन मॅनेजर मनोहर अर्जुन जकाते, कंपनीचे मालक करण किर्तीकुमार बोथरा व आमच्या कार्यालयाचे कर्मचारी विशाल गौतम थोरात असे मिळुन नारायणगाव येथील आमच्या शाखेस भेट देवुन ॲमेझॉन कंपनीकडुन आलेले पार्सल, ग्राहकांना दिलेले पार्सल व त्या बदल्यात जमा झालेल्या रक्कमेबाबत पहाणी केली असता पार्सल मधून एकूण जमा रक्कमेपैकी रु.1,06,650/- इतके रक्कम कमी असल्याचे दिसुन आले. तसेच त्यावेळी आम्ही ग्राहकांनी मागणी केलेल्या पार्सलची ही पाहणी केली असता आम्हाला रोहीत काशिनाथ पवार तसेच किरण थोरात व स्वप्निल आल्हाट यांनी ॲमेझॉन कंपनीकडून आलेले पार्सल मधील एकून 1,05,906/- रूपये किंमतीचे 36 पार्सलचा कंपणीच्या परस्पर अपहार केल्याचे दिसून आले.
असे कंपनीच्या नारायणगाव शाखेतील ग्राहकांना दिलेल्या पार्सलच्या बदल्यात ग्राहकांकडून जमा झालेल्या रक्कमेपैकी 1,06,650/- रु. रोख रक्कम व 1,05,906/- रूपये किंमतीचे 36 पार्सल असा एकून 2,12,556/- रुपयांचा स्वप्निल आल्हाट, किरण थोरात व रोहित पवार या तिघांनी मिळून अपहार केला आहे.
तरी टोको लॉजि प्रा.लि. या खाजगी कंपनीचे नारायणगाव शाखेत काम करणारे स्वप्निल तानाजी आल्हाट रा.वारुळवाडी, शभसंपदा अपार्टमेंट, ता. जुन्नर, जि. पुणे, किरण नामदेव थोरात, रा. आदेश रेसिडन्सी, पारी कंपनीजवळ, नऱ्हे पुणे व रोहित काशिनाथ पवार, रा. नारायणगाव, खोडद रोड, ता. जुन्नर, जि. पुणे या तिघांन ॲमेझॉन कंपनीकडून आलेले 1,05,906/- रु. किंमतीचे 36 पार्सल (साहित्य) व ग्राहकांचे रोख झालेले 1,06,650/- रु असे एकून 2,12,556/- रूपयांचा कंपणीचे परस्पर अपहार केला आहे. सदर तिघांविरुध्द फिर्यादी यांनी कंपनीतर्फे कायदेशिर तक्रार दिली आहे. त्यानुसार नारायणगाव पोलीस स्टेशन यांनी अपहराचा गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगादेवप्पा पाटील हे करत आहेत.