
स्वराज्य संवाद प्रतिनिधी – दिपाली खिरड
घोडेगाव वकील संघाची निवडणुक दि. १६/०१/२०२६ रोजी पार पडली त्यामध्ये अध्यक्ष पदी अँड. संजय दत्तात्रय आर्विकर यांची बहुमताने निवड करण्यात आली. त्याचबरोबर उपाध्यक्ष म्हणून अँड. दिपक विलास लोहाटे व अॅङ माधुरी सदानंद ढवळे, सचिव म्हणुन अँड.अक्षदा मारुती ठोंबरे तसेच खजिनदारपदी अँड. संगिता गावडे यांची निवड करण्यात आली.घोडेगाव वकील संघाची निवडणुक खेळी मेळीच्या वातातरणात पार पाडली.
अँड. आर्विकर व इतर पदाधिकारी यांचा घोडेगाव वकील संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. न्यायालयातील वर्षभरातील सर्व शासकीय कार्यक्रम तसेच न्यायालय परिसरातील सुशोभिकरण, स्वच्छ पाणी पुरवठा याबरोबरच वकीलांच्या अडीअडचणी व समस्या सोडविण्यासाठी कटीबध्द असल्याचे आश्वासन अँड. आर्विकर यांनी यावेळी दिले. अध्यक्ष व कार्यकारणी निवडीबदल वकीलसंघ व अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
अँड. आर्विकर हे गेल्या ३० वर्षापासून वकीली व्यवसाय करत असून त्यांचा शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक व सहकार क्षेत्राशी चांगला संपर्क आहे. अध्यक्षपदाचे काळात वकील वर्गासाठी वेगवेगळ्या धोरणांचा अवलंब करुन उल्लेखनीय कामगीरी केली जाईल असे अश्वासन त्यांनी दिले.
मुख्य निवडणुक अधिकारी म्हणून अँड अनिल जी. पोखरकर व सहाय्यक निवडणुक अधिकारी म्हणून अँड प्रतिक गोडसे व अँड सिध्देश टाके यांनी काम पाहिले.


