जाहिरात
WhatsApp Image 2025-06-01 at 7.03.37 PM (1)

मधुबन प्रोऍक्टिव्ह अबॅकस सेंटरच्या विद्यार्थ्यांचे नॅशनल कॉम्पिटीशनमध्ये घवघवीत यश

मधुबन प्रोऍक्टिव्ह अबॅकस सेंटरच्या विद्यार्थ्यांनी नॅशनल कॉम्पिटीशन सण 2025-26 मध्ये घवघवीत यश मिळवले आहे. गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट पुणे येथे झालेल्या स्पर्धेत संपूर्ण भारतातून विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.

प्रतिनिधी – दिपाली खिरड

दरम्यान मिळालेली माहिती अशी की, दि. 25 फेब्रुवारी 2026 रोजी वैदिक मॅथ्स मध्ये कु.भार्गव संतोष कराळे याने 100 पैकी 100 गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यास प्रथम क्रमांकाची ट्रॉफी व सायकल देऊन गौरविण्यात आले.

अबॅकस स्पर्धेत कु.गौरव मोरे याने संपूर्ण भारतातून पहिला क्रमांक पटकावला आहे. त्याने 100 पैकी 98 मार्क्स मिळवले आणि ट्रॉफी व सायकल जिंकली. मधुबनच्या 8 विद्यार्थ्यांनी वैदिक मॅथ्स स्पर्धेत सहभाग नोंदवला आणि 6 विद्यार्थी ट्रॉफी विनर ठरले. अबॅकस स्पर्धेत 12 विद्यार्थी ट्रॉफी विनर ठरले.

सर्व विजयी विद्यार्थ्यांना प्रोऍक्टिव्हचे डायरेक्टर श्री गिरीश करडे सर, श्री अजय मणियार सर, सौ. सारिका करडे मॅम, ज्योती मणियार मॅम, व श्री राज लोचनी सर यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. मधुबन प्रोऍक्टिव्ह अबॅकस सेंटरच्या श्री संतोष कराळे सर व सौ वैशाली कराळे मॅडम तसेच सौ. नीलम शिंदे मॅडम व सौ ज्योति गेंगजे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

वैदिक मॅथ्स विजयी विद्यार्थ्यांची नामावली – कु. भार्गव संतोष कराळे (प्रथम क्रमांक), सोहम गांजवे (10th), आयुशा शिंदे (4th), कृतिका बनसोड (4th), अर्णवी मंडलिक (10th), शर्वरी गावडे (5th)

अबॅकस विजयी विद्यार्थ्यांची नामावली – कु. गौरव मोरे (प्रथम क्रमांक), तनिष्का वाबळे (15th), अभिमन्यू पिचड (6th), श्रीयोग जगताप (8th), रायका कोकणे (12th), अनविका बोऱ्हाडे (11th), जागृती काजळे (12th), स्वरूप नवले (15th), ऋत्विक तोत्रे (12th), तन्मय बर्डे (10th), स्वयंम वाडेकर (15th), राजवर्धन जगताप (8th) अशी नावे आहेत. मधुबन प्रोऍक्टिव्ह अबॅकस सेंटरच्या विद्यार्थ्यांना भविष्यातील यशासाठी आंबेगाव तालुक्यातील जनतेकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!