
प्रतिनिधी – घोडेगाव
तीर्थक्षेत्र श्री हरिचंद्र महादेव संस्थानच्या विश्वस्त पदाच्या दोन रिक्त जागेवर अनुक्रमे घोडेगावच्या माजी सरपंच सौ क्रांतीताई प्रशांत गाढवे व घोडेगाव विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव श्री सुरंजन तानाजी काळे यांची निवड विश्वस्त मंडळाने बहुमताने केली असे संस्थांनचे अध्यक्ष श्री प्रशांत काळे यांनी सांगितलेदेवस्थानच्या इतिहासात पहिल्यानंदाच विश्वस्त पदावर महिलीची निवड करण्यात असल्याने सर्व स्तरावरून विशेषतः महिला वर्गातून देवस्थानच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.
श्री हरिचंद्र महादेव संस्थानास महाराष्ट्र शासनाचा तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त असून 82 लाख रुपये खर्चून भोजनगृह व स्वच्छतागृह बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे तसेच पुरातन मंदिराचे जीर्ण झालेले दगड काढून नवीन दगड बसवून जीर्णोद्धाराचे काम सुरू असल्याचे सचिव नितीन काळे व कोषाध्यक्ष राजेश काळे यांनी सांगितले नवनिर्वाचित विश्वस्तांचा सत्कार उपाध्यक्ष बाळासाहेब आनंदराव कार्याध्यक्ष रवींद्र करपे विश्वस्त प्रमोदशेठ गांधी, कुंदन काळे सल्लागार संजय आर्वीकर, भगवान शेठ भागवत, संजय नांगरे, संतोष बोराडे घोडेगावचे उपसरपंच कपिल सोमवंशी यांच्या हस्ते करण्यात आला.