
आंबेगाव तालुक्यातील पारगाव गावचे हद्दीतील कौटमळा येथील राजाराम कोंडीबा थोरात वय 65 वर्षे रा. पारगाव कौटमळा, ता. आंबेगाव, जि.पुणे यांनी त्यांचे शेतात असणाऱ्या लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे, थोरात हे एस आर पी ग्रुप नंबर २, मध्ये पोलीस हवालदार म्हणून सेवानिवृत्त झालेले होते.
स्वराज्य संवाद – पारगाव प्रतिनिधी
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दिनांक 22/09/2025 रोजी सकाळी राजाराम थोरात हे पुणे येथुन गावी आले होते आणि दुपारी ३ च्या सुमारास शेतात काम करण्यासाठी गेले असता राजाराम थोरात यांनी त्यांचे शेतात जवळच असणाऱ्या लिबांच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे शेजारील लोकांना दिसले.
त्यांनतर थोरात यांनी आत्महत्या केल्याचे माहित होताच घडलेल्या घटनेच्या ठिकाणी लोंकानी गर्दी केली. त्यावेळी गर्दी मधूनच जवळील एका व्यक्तीने पोलीसांना फोन केला व घडलेली घटना सांगितली, त्यानंतर पारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अजित मडके व त्यांचे सोबत असणारे सहकारी घटना घडलेल्या ठिकाणी आले. त्यानंतर पोलीस व मयत राजाराम थोरात यांचे पुतणे तुषार निवृत्ती थोरात व तेथील लोकांनी राजाराम थोरात यांनी गळफास घेतलेल्या झाडाचे सोडवून खाली घेतले व रुग्णवाहिके मधून उपजिल्हा रूग्णालय मचंर येथे आणण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी राजाराम कोंडीबा थोरात हे मयत झाले असल्याचे सांगीतले.
त्यानंतर राजाराम कोंडीबा थोरात यांना उपजिल्हा रुग्णालय मंचर येथेच शव विच्छेदनासाठी नेण्यात आले असून सदर घडलेल्या घटनेची तक्रार तुषार निवृत्ती थोरात यांनी पारगाव पोलीस ठाण्यात दिली आहे, मात्र सदर थोरात यांनी आत्महत्या का केली याची कोणतीही माहिती अध्याप मिळालेली नसून सदर घडलेल्या घटनेचा तपास पारगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नेताजी गंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार मडके व त्यांचे सहकारी करत आहे.


