प्रमोद बाणखेले

वृद्ध महिला-पुरुषांना लुबाडणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड; मंचर पोलिसांची मोठी कारवाई

मंचर प्रतिनिधी – दिपाली खिरड

बनावट सोन्याची बिस्किटे दाखवून वृद्ध नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका सराईत आंतरजिल्हा टोळीला जेरबंद करण्यात मंचर पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी ६ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून १ लाख रुपये किमतीची कार आणि २ लाख ९३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण ३ लाख ९३ हजार १९३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नेमकी घटना काय?

मंचर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून वृद्ध महिला व पुरुषांना गाठून, त्यांना विश्वासात घेऊन “हे सोन्याचे बिस्किट आहे, हे घेतल्यास तुमचा फायदा होईल” असे आमिष दाखवून त्यांच्याकडील खरे सोन्याचे दागिने काढून घेण्याचे प्रकार वाढले होते. हे गुन्हेगार परजिल्ह्यातील असल्याने गुन्ह्यानंतर तातडीने पसार होत असत.

अशी झाली अटक

पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असताना, ९ एप्रिल २०२६ रोजी रात्री पुणे-नाशिक हायवेवर कळंब (ता. आंबेगाव) हद्दीत जिवन हॉटेलजवळ एक पांढऱ्या रंगाची टोयोटा कार (MH-12-KN-3898) संशयास्पदरीत्या उभी असल्याचे पोलिसांना आढळली. पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता त्यात ६ जण मिळून आले. कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

अटक केलेले आरोपी

१) गणेश विनायक गायकवाड (वय ३७, रा. पाथर्डी, अहिल्यानगर)२) बंडू लक्ष्मण जाधव (वय ४८, रा. गांधीनगर, बीड)३) मनोहर भाऊसाहेब जाधव (वय ३५, रा. पाथर्डी, अहिल्यानगर)४) खंडू बंडू जाधव (वय २०, रा. गांधीनगर, बीड)५) सतिश रस्तूम पवार (वय ३३, रा. गांधीनगर, बीड)६) सोमनाथ निवृत्ती फुंदे (वय ४५, रा. पाथर्डी, अहिल्यानगर)

तीन गुन्हे उघड

या आरोपींनी मंचर पोलीस ठाण्यातील तीन वेगवेगळे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांच्याकडून फसवणूक करून मिळवलेले सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. सध्या हे सर्व आरोपी पोलीस कोठडीत असून अधिक तपास सुरू आहे. ही कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे आणि पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि मंचर पोलिसांच्या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Most Popular

Recent Comments