जाहिरात
WhatsApp Image 2025-06-01 at 7.03.37 PM (1)

मंचरमध्ये वृद्धाला लुटले; १० तोळ्यांच्या सोन्याच्या बिस्किटाचे आमिष दाखवून मणी मंगळसूत्र लंपास

प्रतिनिधी – विश्वजित गवारी

सोन्याचे बिस्किट देण्याच्या बहाण्याने चार अज्ञात भामट्यांनी एका वृद्ध महिलेची फसवणूक करून तिचे १ लाख रुपये किमतीचे सोन्याचे मणी मंगळसूत्र लंपास केल्याची घटना मंचर येथे घडली आहे. याप्रकरणी कलाबाई शाम मोहिते (वय ७०, रा. इंदिरारानगर, मंचर) यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

घटनेची हकीगत
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी कलाबाई मोहिते या मंगळवार, ७ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५:३० च्या सुमारास त्या आपल्या मुलीच्या घरी पायी जात होत्या. मंचर हद्दीतील एसटी स्टँडजवळ असलेल्या मयूर मिसळ हॉटेलपाशी दोन अज्ञात व्यक्ती त्यांच्याजवळ आल्या त्यातील एकाने “आमच्याकडे १० तोळ्यांचे सोन्याचे बिस्किट आहे, पण पावती नसल्यामुळे आम्हाला ते विकता येत नाही. तुम्ही तुमचे कमी वजनाचे दागिने आम्हाला द्या आणि हे बिस्किट तुम्ही ठेवा,” असे आमिष दाखवले. त्याचवेळी तिथे आणखी दोन लोक आले. त्या भामट्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी आपल्या गळ्यातील एक तोळे वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र त्यांना दिले व त्याबदल्यात त्यांनी दिलेले बिस्किट घेतले.

फसवणूक झाल्याचे उघड
भामटे निघून गेल्यानंतर कलाबाई मोहिते यांनी आपल्या मुलीला हा प्रकार सांगितला. त्यांनी जवळ असलेल्या बिस्किटाची खात्री केली असता, ते सोन्याचे नसून तांब्याच्या धातूचे असल्याचे निष्पन्न झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी घाबरलेल्या अवस्थेत घर गाठले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, ८ एप्रिल रोजी त्यांनी नातवासोबत पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.

पोलिसांची कारवाई
मंचर पोलिसांनी याप्रकरणी चार अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१८(४) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शेखर भोईर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

भूलथापांना बळी पडू नका रस्त्याने जाताना कोणीही अनोळखी व्यक्ती “आम्हाला सोन्याचे बिस्किट/नाणे सापडले आहे” किंवा “पावती नसल्याने स्वस्त विकायचे आहे” असे सांगत असेल, तर त्यांच्याशी बोलणे टाळा.

दागिन्यांची अदलाबदल टाळा स्वतःचे सोन्याचे दागिने देऊन त्याबदल्यात अनोळखी व्यक्तीकडून कोणतीही वस्तू घेऊ नका. फसवणूक करणारे लोक पितळ किंवा तांब्याला सोन्याचा मुलामा देऊन नागरिकांना लुटतात.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!