
प्रतिनिधी – पुणे
घेतलेले पैसे परत दिल्याशिवाय मी तुला सोडणार नाही असे म्हणत आरोपी – सोमनाथ झळक यांनी परमेश्वर देविदास गलांडे रा. गलांडवाडी नं. २, इंदापूर यांचे केले अपहरण पती घरी न आल्याने पत्नी रेणुका गंलाडे यांनी केला इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, फिर्यादीचे पतीचे जुने गाडीचे खरेदी विक्री दुकान आहे, मात्र दि 11/06/2025 रोजी सकाळी 06/00 वा चे सुमारास फिर्यादीचे पती परमेश्वर गंलाडे यांना इसम नामे सोमनाथ झळक यांचा फोन आला आणि म्हणाला की, भेटण्याकरीता इंदापुरला या त्यावेळी फिर्यादीचे पती फिर्यादी यांना म्हणाले की, मला सोमनाथ झळक यांनी मला फोन करून बोलावले आहे, मी त्यांना भेटुन येतो असे सांगुन ते इंदापुर येथे निघुन गेले. त्यानंतर फिर्यादी यांनी सकाळी 08/30 वा चे सुमारास पती परमेश्वर गलांडे यांना फोन करून तुंम्ही कुठे आहेत, घरी कधी येणार आहेत, अशी विचारणा केली असता ते फिर्यादी यांना म्हणाले की, सोमनाथ झळक माझे सोबत आहे तो मला म्हणतो की, माझे घेतलेले पैसे दिल्याशिवाय मी तुम्हाला सोडणार नाही, असे फोनद्वारे सांगितले अणि फोन ठेवुन दिला.
त्यानंतर फिर्यादी यांनी सायंकांळी 04/30 वा चे सुमारास त्यांचे पती परमेश्वर यांना फोन केला असता मोबाइल फोन बंद लागल्याने फिर्यादी यांनी त्यांचे चुलत दिर नारायण गंलाडे यांना फोन करून पती परमेश्वर हे तुमचेकडे आले आहेत का? याबाबत चौकशी केली असता ते आले नसल्याचे फिर्यादी यांना समजले त्यानंतर फिर्यादी यांनी त्यांचे चुलत दिर नारायण गलांडे यांना घरी बोलावुन सविस्तर माहिती सांगितली त्यानंतर नारायण गलांडे यांनी सोमनाथ झळक व फिर्यादीचे पती या दोघांना फोन केला असता त्यांचा फोन बंद लागला, म्हणुन फिर्यादी यांची खात्री झाली की, फिर्यादीचे पती परमेश्वर देविदास गंलाडे यांना इसम नामे सोमनाथ झळक यांने तुला पैसे परत केल्याशिवाय मी तुला सोडणार नाही असे म्हणून फिर्यादीचे पती परमेश्वर यांचे अपहरण केले आहे. असे फिर्यादी यांनी तक्रारीत म्हणले आहे, त्यामुळे इंदापुर पोलीस ठाण्यात सोमनाथ झळक याचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास इंदापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे हे करत आहेत.


