
प्रतिनिधी – रांजणगाव गणपती
याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, गुप्त माहीतीदारामार्फत माहिती मिळाली आहे की, मौजे रांजणगाव गणपती गावचे हद्दीत सोने सांगवी रोडचे कडेला काळुबाई मंदिरा शेजारी ता. शिरूर जि पुणे येथे श्री महागणपती गॅस सेल्स अण्ड सर्विस दुकानामध्ये बेकायदेशीरपणे घरगुतीचे वापराचे सिलेंडर मधील गॅस लहान टाक्यामध्ये मानवी जीवन धोक्यामध्ये येईल अशा धोकादायक व बेकायदेशिर पणे भरुन त्याची विक्री करीत असल्याचे पोलिसांना कळाले.त्यानंतर आम्ही पोलीस स्टाफसह सदर ठिकाणी जावुन पाहणी केली असता घरगुती वापराचे सिलेंडर व लहान सिलेंडर घेवून आरोपी शुभम लोणे हा बसलेला दिसून आला.
त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक एन. एम तिडके यांनी तेथील पंच व साथीदारांसमक्ष श्री महागणपी गॅस सेल्स अण्ड सर्विस चे दुकानाची तपासणी केली असता दुकानामध्ये असणारे शुभम बन्सीधर लोणे वय 28 वर्षे सध्या रा. रांजणगाव गणपती, शेळकेवस्ती येथील सागर लांडे यांचे खोलीमध्ये असल्याचे सांगितले. सदर आरोपीकडे गॅस रिफिलींग करणे बाबतची अधिकृत परवानगी असले बाबत व योग्य ती कागदपत्र सादर करणे बाबत विचारणा केली असता त्यांनी काही एक उपयुक्त महिती व शासकीय परवाना अगर योग्य ती कागदपत्र दिलेली नाहीत तसेच घरगुतीचे वापराचे सिलेंडर मधील गॅस लहान टाक्यामध्ये मानवी जीवन धोक्यामध्ये येईल अशा धोकादायक व बेकायदेशिर पणे भरत असताना व त्याची लोकांना विक्री करीत असताना मिळून आले आहे.
त्यानंतर पंचांसमक्ष घरगुतीचे वापराचे गॅस सिलेंडर व साहीत्य, वजन काटा जप्त करण्यात आला असून आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहीता कलम 287 व अत्यावश्यक सेवा वस्तु अधिनियम 1955 चे कलम 3,7 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय सरजिने हे करत आहेत.
दरम्यान पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांमध्ये मानवी जीवनाला त्रास होईल असे धोकादायक व बेकायदेशीर व्यवसाय कोणी करत असेल तर आपल्या जवळील पोलीस स्टेशनची संपर्क करून कायदेशीर कारवाई करण्याचे आवाहन भाजपा युवा मोर्चा आंबेगाव तालुका माजी अध्यक्ष, जिल्हा सचिव उत्तर पुणे प्रमोद हरिभाऊ बाणखेले यांनी केले आहे.