
मंचर नगरपंचायत हद्दीतील श्रीकृष्ण हनुमंत बेंडे पाटील यांनी जयसिंग भगवंत बेंडे पाटील तक्रारदार यांचे मालकीच्या जागेवर अनधिकृत बांधकाम केलेमुळे सदर श्रीकृष्ण बेंडे पाटील या व्यक्तीवर मंचर नगरपंचायतचे स्थापत्य अभियंता नगरपंचायत मंचरचे अधिकारी संदिप दिलीप पवार यांनी मंचर पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे.
स्वराज्य संवाद प्रतिनिधी मंचर
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मंचर नगरपंचायत हद्दीतील चांडोली रोडवरील बेंडेमळा येथील सर्वे नंबर ४३/१४, मंचर ता. आंबेगाव जि. पुणे या जागेवर श्रीकृष्ण हनुमंत बेंडे पाटील यांनी तक्रारदार जयसिंग बेंडे पाटील यांचे मालकीच्या जागेवर अनधिकृत बांधकाम केले असून सदर श्रीकृष्ण बेंडे या व्यक्तीवर एम.आर.टी.पी कायदया अंतर्गत गुन्हा नोद करुन सदर बांधकाम निष्काशीत करण्यात यावे असा अर्ज जयसिंग भगवंत बेंडे पाटील यांनी दि.०६/०८/२०२५ रोजी मंचर नगरपंचायत कार्यालयात लेखी तक्रारी अर्ज दिला होता.
सदर तक्रारी अर्जाचे अनुशंगाने मंचर नगरपंचायतचे सबंधित अधिकारी यांनी पाहणी करुन श्रीकृष्ण हनुमंत बेंडे पाटील यांना मंचर नगरपंचायत यांची कोणतीही पूर्व परवानगी न घेता सर्वे नंबर ४३/१४ मधे अनाधिकृतपणे केलेले बांधकाम ३० दिवसांचे आत स्वखर्चाने काढून घेण्यात यावे याबाबत त्यांना महाराष्ट्र प्रादेशीक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ५२ व ५३ अन्वये दि. ०३/०९/२०२५ रोजी नोटीस देण्यात आली होती.
मात्र दि. १३/११/२०२५ रोजी दुपारच्या वेळेत फिर्यादी मंचर नगरपंचायतचे अधिकारी तसेच त्यांचे सोबत वरद सुभाष थोरात (करनिर्धारक प्रशासकिय अधिकारी नगरपंचायत मंचर), मंचर नगरपंचायत चे शिपाई इनायम मिर्झा व मंचर नगरपंचायत मुकादम संदिप लोंढे असे सर्वजण मंचर नगरपंचायत हद्दीतील चांडोली रोडवरील बेंडेमळा येथील सर्वे नंबर ४३/१४ या जागेवर जावुन पंचासमक्ष पाहणी केली असता मंचर नगरपंचायतने एम. आर. टी. पी कायदा कलम ५२, ५३ अंतर्गत दिलेल्या नोटीसचे श्रीकृष्ण हनुमंत बेंडे पाटील यांनी अनुपालन केले नाही असे निदर्शनास आले असुन सदर अनाधिकृत बांधकामाचा दोन पंचासमक्ष पंचनामा करण्यात आला.
तरी सर्वे नंबर ४३/१४, मंचर ता. आंबेगाव जि. पुणे या जागेवर श्रीकृष्ण हनुमंत बेंडे पाटील यांनी मंचर नगरपंचायतीची कोणतीही पुर्व परवानगी न घेता बांधकाम केलेमुळे फिर्यादी मंचर नगरपंचायतचे स्थापत्य अभियंता नगरपंचायत मंचरचे अधिकारी संदिप दिलीप पवार यांनी दिलेल्या कायदेशीर तक्रारीनुसार मंचर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५२ अन्वये गुन्हा केला.
सदर गुन्ह्याचा तपास मंचर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकरी श्रीकांत कंकाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गणपत डावखर हे करत आहेत.
दरम्यान मंचर नगरपंचायत हद्दीत अनाधिकृत बांधकामे केली असल्यास त्यावरदेखील संबंधित मंचर नगरपंचायत अधिकारी यांनी पंचनामे करून सदर अनाधिकृत केलेल्या बांधकामांवर कारवाई करण्यात यावी असे अवाहन सामाजिक संघटना करत आहेत.
व्हिडीओ न्यूज पाहण्यासठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.


