जाहिरात
WhatsApp Image 2025-06-01 at 7.03.37 PM (1)

अखेर स्वीटीला व तिच्या बाळाला मिळाला न्याय ❗मंचर पोलिसांनी घेतली दखल❗ केला गुन्हा दाखल ❗

लग्नानंतर वेळोवेळी स्वीटीचा जाच हाट करुन तिला धमकावुन शिवीगाळ केली आणि ती गरोदर आहे हे माहीती असताना तिला मारहाण केल्याने तिचा तसेच तिच्या पोटातील बाळाचा मृत्यु होवु शकतो याची जाणिव असताना देखील तीला मारहान केली त्यामुळे स्वीटीचे पोटातील बाळ मयत झाले आणि ती देखील सदरच्या मारहाणीमुळे तिचे गर्भपिशवीतुन रक्तश्राव होवुन ती उपचारा दरम्यान मयत झाली याबाबतची तक्रार बबीता संजय टाव्हरे यांनी मंचर पोलीस स्टेशनला दिली, त्यानुसार आरोपी अक्षय बाळासाहेब बागल यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

स्वराज्य संवाद – मंचर

याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, फिर्यादीयांची मुलगी स्विटी हिचे लग्न झाल्यापासुन 03 महीने आरोपी अक्षय बागल याने तिला व्यवस्थित नांदविले त्यांनतर तो तिला सारखे काहीतरी कारण काढुन मारहाण करत असायचा. त्यामुळे फिर्यादी यांची मुलगी स्विटी ही माहेरी घरी येवुन फिर्यादी आई यांना आरोपी अक्षय बागल हा चांगला मुलगा नाही तो दारु पिवुन मला नेहमी मला मारहाण करीत असतो असे नेहमी फिर्यादीस सांगत होती.

स्वीटी हिस दिवस गेल्यानंतर एके दिसशी गरोदर पनातच आरोपी अक्षय याने स्वयपाकाचे कारणावरुन कमरेत लाथ मारली होती, त्यानंतर वेगवेगळ्या कारणावरुन आरोपी अक्षय हा मारहान करत असल्याबाबत स्वीटी ने फिर्यादीस सांगीतले होते.

त्यानंतर फिर्यादी यांनी आरोपी अक्षय बागल याला घरी बोलावून सांगीतले होते की, माझी मुलगी स्विटी गरोदर आहे तुम्ही तीला या आवस्थेत मारहान करत जावु नका असे समजावुन सांगीतले होते. परंतु अक्षय बागल हा सांगुन ही फिर्यादी यांची मुलगी स्विटी हीला मारहान करुन तीला त्रास देत होता. आरोपी अक्षय बागल हा त्याचे आई व वडील यांना देखील मारहान करत होता त्यामुळे त्याचे आई वडील अक्षय बागल याला घाबरत होते त्यामुळे अक्षय बागल हा स्वीटीला मारहाण करत असताना कोणीही मधे येत नव्हते.

मात्र अक्षय बागल हा स्विटी हिला मारहान करीत होता याबाबत फिर्यादी यांनी आरोपीची बहीण छाया आवटे हीला सांगीतले होते तीने देखील अक्षय बागल हीला समजावुन सांगीतले होते परंतु तो तीचे देखील एकत नव्हता.

ऑगस्ट 2025 मध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये स्वीटी हिला 08 वा महीना चालु असताना ती माहेरी घरी आली होती. त्यानंतर दोन दिवसांनी सांयकाळी 05 वा चे सुमारास स्विटी व फिर्यादी यांच्या जाऊबाई सखुबाई टाव्हरे हे बोलत असताना आरोपी अक्षय बागल हा घरी आला व स्विटी हिचे ” केसाला धरुन तु सासरी का येत नाही ” असे म्हणत स्वीटीला धमकावत शिवीगाळ करून हाताने लाथाबुक्यांनी मारहाण करत असे. त्यावेळी फिर्यादी व जाउबाई यांनी आरोपी अक्षय याला सांगत असे की, “स्वीटी ही गरोदर आहे तु तीला मारु नको” परंतु अक्षय कोणाचेही काही न ऐकता तीला घेऊन जबरदस्तीने त्याचे मोटारसायकल वरुन त्यांचे घरी निघुन गेला. तर स्वीटी ही तिला होणाऱ्या त्रासाबाबत तिच्या मैत्रिणींना नेहमी सांगत असे.

तदनंतर दि.26/09/2025 रोजी रात्री 10/00 वा चे सुमारास स्विटीने फिर्यादी यांना फोन केला तब्येतीची विचारपुस केली, आणि पहाटे 03/00 वा अक्षय याचेसाठी डब्बा करायला उठायचे आहे असे सांगुन तीने फोन ठेवला.
त्यानंतर रात्री 02/00 वा चे सुमारास फिर्यादी यांना अक्षय बागल याने फोन करून स्विटीला डीलीव्हरीसाठी सरकारी दवाखाना मंचर येथे आणले आहे. असे सांगुन तुम्ही दवाखाण्यात या असे सांगुन त्याने फोन ठेवला. त्यानंतर एवढ्या रात्री दवाखाण्यात जाण्याची सोय नसल्याने फिर्यादी सकाळी 05/30 वा चे सुमारास बहीणीचा मुलगा सुमीत नारखेडे याला बोलावुन घेतले त्यानंतर फिर्यादी हे मंचर कडे येत असताना आरोपी अक्षय बागल याला फोन केला तर त्याने सांगितले की, तुम्ही सार्थक हॉस्पीटल मंचर येथे या असे बोलुन फोन ठेवला.

त्यानंतर फिर्यादी हे 06/00 वा चे सुमारास सार्थक हॉस्पीटल येथे पोहचले असता दवाखान्यातील सिस्टर ह्या मृत बाळाला घेवन फिर्यादी यांचे समोर आल्या, तेव्हा सदर ठिकाणी अक्षय बागल त्याची बहीण माया टाव्हरे हे हजर होते, त्यानंतर फिर्यादी यांना समजले की सदरचे मृत बाळ हे मुलगी स्विटी हीचे आहे.

त्यानंतर सदर मृत बाळ (मुलगी) तुम्ही घेवुन जाणार आहे का असे सिस्टर ने विचारले असता माया टाव्हरे म्हणाल्या की, तुम्ही त्याचा अंत्यविधी करा त्याचा काय खर्च असेल तो आम्ही देवु असे म्हणाल्यावर सिस्टर सदचे बाळ घेवनु त्या ठिकाणाहून निघुन गेली.

त्यानंतर डॉक्टर म्हणाले की स्विटीचे ब्लडींग थांबत नाही, त्यावर आम्हाला उपचार करावे लागेल, त्यानंतर देखील स्विटीचे ब्लडींग थांबले नाही. सदर हॉस्पीटल मध्ये जास्त खर्च होत असल्याने अक्षय बागल त्याची बहीण छाया आवटे तीचा पती तसेच अक्षयचा दाजी हिरामण टाव्हरे व त्याची आई संगीता बागल असे सर्वांनी मिळुन तीला वाय. सी. एम हॉस्पीटल पिंपरी चिंचवड पुणे येथे घेवुन गेले त्यावेळी वाय. सी. एम हॉस्पीटल मध्ये बेड उपलब्ध नसल्याने त्यांनी स्वीटीला डी. वाय पाटील हॉस्पीटल येथे नेले. त्या ठिकाणी एक दिवस उपचार केले व दुस-या दिवशी लगेच आम्ही स्विटी हीला घेवुन ससुन हॉस्पीटल पुणे येथे दि. 28/09/2025 रोजी सकाळी 07/00 वा चे सुमारास नेवुन ऍडमिट केले.

त्यावेळी स्विटी हीने सांगीतले की अक्षय याने मारहान केल्यामुळे त्रास झाला आहे. त्यातुळेच मला पोटात दुखायला लागले होते. त्यानंतर स्विटीची प्रकृती आणखी खालावली व ती बोलायची बंद झाली. त्यानंतर 05/10/2025 रोजी सकाळी 05/00 वाचे सुमारास ससुन हॉस्पीटल पुणे येथे उपचार घेत असताना स्विटी अक्षय बागल वय 27 वर्षे ही मयत झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगीतले. असे तक्रारदार यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

सदर घटनेचा तपास मंचर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील धनवे हे करत आहेत.

दरम्यान स्वीटी आणि तिचे बाळ (मुलगी) छळ करून मारहाण केल्यामुळे मयत झाले असल्याने सदर घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात असून सदर आरोपीस कठोरात कठोर शासन होण्याची मागणी स्वीटीची आई आणि गावातील जनता, तसेच सामाजिक संघटनांकडून होत आहे.

व्हिडीओ बातमी पाहण्यासाठी 👇👇येथे क्लिक करा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!