
आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी गावच्या हद्दीतील शेरीमळा येथे फ्लॉवर पीक असणाऱ्या शेतातमध्ये सिद्धांत गणेश कठाळे वय वर्षे ४ हा खेळत होता, त्याच दरम्यान त्याचा सख्या काका पिकअप गाडी मागे घेत असताना चिमुकल्याला धक्का लागल्याने तो खाली पडला आणि त्याचे अंगावरून चाक गेल्याने या चार वर्षाच्या चिमुरड्याचा जागीच मृत्यू झालं आहे.
स्वराज्य संवाद – मंचर
याबाबत गणेश काकासाहेब कठाळे यांनी त्यांचा सख्खा भाऊ पिकअप चालक संतोष काकासाहेब कठाळे याच्या विरुद्ध मंचर पोलीस स्टेशनला तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, आदर्शगाव गावडेवाडी गावच्या हद्दीतील शेरीमळा येथील गणेश काकासाहेब कठाळे राहणार गावडेवाडी रासुराममळा तालुका आंबेगाव जिल्हा पुणे, मूळ राहणार बीड जिल्ह्यातील असून सदर कठाळे कुटुंब हे गेल्या अनेक वर्षापासून गावडेवाडी हद्दीतील असणाऱ्या शेतांमध्ये मजुरीचे काम करत असतात.

रविवार दिनांक ५ ऑक्टोंबर रोजी सकाळी पावणे अकरा वाजायचे सुमारास संतोष काकासाहेब कठाळे हे त्याचे ताब्यातील महिंद्रा पिकअप नंबर एम एच 12 टी.व्ही 3277 ही गाडी फ्लॉवर पिकाचे शेतामध्ये मागे घेत असताना फिर्यादी यांचा मुलगा सिद्धांत गणेश कठाळे वय वर्ष चार याला पिकअप गाडीचा धक्का लागल्याने खाली पडला आणि गाडीचे पाठीमागील क्लीनर बाजूचे चाक त्याच्या अंगावरून जाऊन त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
अपघात झालेल्या या घटनेचा तपास मंचर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार संतोष मांडवे हे करत आहेत.
तर अचानक घडलेल्या या अपघातामुळे गावडेवाडी तसेच रासुराममाळा परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून गावात शोककळा पसरली आहे तर सिद्धांतच्या निधनाने कठाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


