स्वराज्य संवाद प्रतिनिधी – देवगाव (आंबेगाव)
शैक्षणिक वर्ष २०२४- २५ मध्ये घेण्यात आलेल्या (महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे) यांच्या मार्फत पुर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आणि नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षेत पारगाव येथील डी. जी. वळसे पाटील न्यू इंग्लिश स्कूलच्या दोन भावांनी शिष्यवृत्ती आणि नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षेत यश संपादन करून स्कूलचे नाव उज्वल केले आहे. या दोन्ही भावांनी उत्कृष्ट गुण मिळवत शिष्यवृत्ती मिळवली असून संपूर्ण परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.

सौ. विमल आणि श्री. बाळू तुकाराम खांडगे यांचे नातू सोहम पिंपळे आणि वेदांत पिंपळे यांनी अनुक्रमे इयत्ता पाचवी मध्ये ८१.२० % (२४२ / २९८) मार्क्स मिळवून शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे तसेच दुसरीच्या वर्गात असताना २०० पैकी १८४ मार्क्स मिळवून राज्यात ९ वा नंबर, तिसरीच्या वर्गात १८६ मार्क्स मिळवून राज्यात आठवा नंबर, चौथीच्या वर्गात पुणे जिल्ह्यात पहिला नंबर पाचवीच्या वर्गात १८८ मार्क्स मिळवून राज्यात ७ वा नंबर तसेच पाचवीच्या वर्गात पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा यामध्ये २९८ पैकी २४२ मार्क्स मिळवून शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.

तसेच त्याच्या सख्खा भाऊ वेदांत पिंपळे याचा नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षेत पहिलीच्या वर्गात असताना २०० पैकी १९४ मार्क्स मिळवून राज्यात ४ था नंबर, दुसरीच्या वर्गात १९० मार्क्स मिळवून राज्यात ६ वा नंबर, तिसरीच्या वर्गात १८० मार्क्स मिळवून राज्यात ११ वा नंबर आणि गणित विषयात १०० पैकी १०० मार्क्स मिळवून उल्लेखनीय कामगिरी या दोन्ही भावांनी केली आहे. त्यांची ही कामगिरी त्यांच्या स्कूल शिक्षक आई यांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्यांच्या कठोर परिश्रमामुळे शक्य झाली असल्याचे त्यांनी सांगितले. देवगावातील सरपंच सौ. दिपाली उल्हास खांडगे आणि ग्रामस्थांनी या भावांना शुभेच्छा दिल्या असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. या यशामुळे परिसरातील इतर विद्यार्थ्यांमध्येही प्रेरणा निर्माण झाली आहे.