जाहिरात
WhatsApp Image 2025-06-01 at 7.03.37 PM (1)

ब्रेकिंग न्यूज

वाढ दिवसानिमित्त कपडे घेण्यासाठी मंचर याठिकाणी येत असताना झाला अपघात. तीन तरुणांचा जागीच मृत्यू…

भरत वाजे याचा वाढदिवसानिमित्त कपडे घ्यावयाचे म्हणून मोटरसायकलवर मंचर याठिकाणी निघालेले अथर्व खमसे, रामदास असवले, भरत वाजे यांचा पळस्टीका फाटा येथे ट्रॅव्हल्स बसची समोरुन धडक बसुन अपघात झाला असून त्यामध्ये तीनही तरुण जागीच ठार झाले आहेत या बाबतची तक्रार संतोष लक्ष्मण खमसे रा. कोळवाडी ता. आंबेगाव जि. पुणे यांनी बस चालक कैलाससिंग गुलाबसिंग यादव रा. पलवण ता. बवेरु जि. बाँदा राज्य उत्तर प्रदेश याचेवर तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे.

स्वराज्य संवाद प्रतिनिधी – घोडेगाव

याबबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, दिनांक. 15/07/2025 रोजी दुपारी 02:30वा. चे. सुमारास अथर्व संदिप खमसे, तसेच गणेश रामदास असवले, भरत सुधाकर वाजे, हे त्यांचे जवळील स्कुटी नंबर MH 14 KM 1211 या गाडीवर ट्रिपल सीट बसुन घोडेगावकडुन मंचर बाजु कड़े जात असताना पळस्टीका फाटा जवळ समोरुन मंचर बाजुकडुन आलेल्या ट्रॅव्हल्स बसचा नंबर UP 90 BT 3570  ह्या बसची समोरुन धडक बसुन अपघात झाला. हा अपघात इतका भयानक होता कि, अथर्व खमसे, रामदास असवले, भारत वाजे हे जागीच मयत झाले आहेत.

अपघात झालेनंतर कोळवाडी या गावातीलच संदिप बाळु गिजरे यांनी फिर्यादी संतोष लक्ष्मण खमसे यांना फोन करून कळवले की, तुमच्या भावाचा मुलगा अथर्व खमसे आणि त्याचे सहकारी गणेश असवले, भरत वाजे यांचा पळस्टीका फाटा येथे अपघात झाला आहे त्यांना हाता, पायास, व डोक्यास गंभीर मार लागुन ते रोडवर पडलेले आहेत, त्यांची कोणतीच हलचाल होत नाही, तुम्ही ताबडतोब या असे सांगितल्याने लागलीच फिर्यादी हे घराशेजारी राहणारा नंदकुमार डामसे यांना बोलवुन त्यांचे सोबत मोटरसायकलवर पळस्टीका फाटा घोडेगाव मंचर रोडवर आले असता तेथे रोडवर बरेच लोक जमा झाल्याचे दिसले, फिर्यादी यांनी सदर घडलेली घटना जवळ जावुन पाहिले असता संदिप बाळु गिजरे यांनी सांगितले की, याच ठिकाणी बस आणि स्कुटीचा अपघात झाला आहे, त्यावेळी फिर्यादी यांनी रोडवर पाहिले असता तेथे तीन ठिकाणी रोडवर रक्त सांडलेले होते तसेच अपघातात दोन्ही गाड्यांचे फायबरचे तुकडे पडलेले होते तसेच अपघातात बसने जखमीना स्कुटीसह फरपटत नेल्याचे दिसत होते.

त्यावेळी तेथील बस मधील थांबलेल्या लोकांकडुन फिर्यादी यांना बस चालकाचे नाव कैलाससिंग गुलाबसिंग यादव रा. पलवण ता. बवेरु जि. बाँदा राज्य उत्तर प्रदेश असे असल्याचे समजले तसेच मुलांना उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे नेल्याचे समजल्याने आम्ही लगेच उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे गेलो त्यावेळी फिर्यादी यांचा पुतण्या अथर्व व त्याचे दोन मित्र या तिघांना मंचर मधील डेड हाऊस मध्ये ठेवले होते. तेथील डॉक्टरांनी त्या तिघांना तपासुन ते तिघेही मयत झाले असल्याचे फिर्यादीने सांगितले.

दरम्यान सदरचा अपघात मंचर बाजुकडुन आलेल्या ट्रॅव्हल्स नंबर UP 90 BT 3570 वरील चालकाने त्यांचे ताब्यातील ट्रॅव्हल्स बस हायगईने हालगर्जीपणे रस्त्याचे परिस्थिती कडे दुर्लक्ष करून स्कुटीला समोरुन धडक देवुन त्याच्या चुकी मुळे झाला असल्याचे फिर्यादीस तेथील लोकांकडुन समजले आहे.

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार घोडेगाव पोलीस स्टेशन यांनी गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा तपास घोडेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सागर पवार यांचे मार्गदर्शनाखाली होत आहे.

दरम्यान तरुणांनी गाडी चालवताना आपले स्वतःची कुटुंबात घरी कोणीतरी आपली वाट पाहत आहेत असा विचार डोक्यात ठेवूनच गाडी चालवावी गाडीची गती कमीत कमी असावी वेळेत नियोजन करावे,अपघात होणार नाहीत याची काळजी घ्यावी व कुटुंबाला देखील कोणत्याही दुःखाला सामोरे जावे लागणार नाही याची काळजी घ्यावी. कोणतेही काम करत असताना किंवा प्रवास करत असताना ” लवकर निघा, वेळेत पोहचा”
विश्वजीत गवारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आमचे प्रतिनिधी

- Advertisment -

Follow Us

Subscribe
Follow

ठळक बातम्या

YouTube Videos

Video thumbnail
सर्व महसूल अधिकारी, कर्मचारी यांचेबाबत #महसूल_मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय
01:42
Video thumbnail
पुन्हा दोन बिबटे एकत्रित❗❗ नेले कुत्र्याला.. घटना सीसीटीव्हीत कैद.
03:37
Video thumbnail
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
00:36
Video thumbnail
जवळ असणाऱ्या काठीने बिबट्याला लावले हुसकावून अण वाचवला शेतकऱ्याने वासराचा जीव ❗घटना सीसीटीव्हीत कैद
01:42
Video thumbnail
मंचर येथील स्मशानभूमीत अघोरीविद्ये सारखा प्रकार - ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण❗महिन्यात दोन घटना
02:44
Video thumbnail
भोरवाडी येथील महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन मंगळसूत्र चोरणारा चोरटा सी सी टीव्हीत कैद
02:33
Video thumbnail
चुकून इनोव्हा गाडीचा स्टार्टर दाबल्यामुळे गाडी गेली पायऱ्यांनी खाली - मंचर निवारा लॉज समोरील घटना
00:48
Video thumbnail
@स्वराज्यसंवाद, महाळुंगे पडवळ येथे चालू असले आंदोलन ग्रामस्थांने घेतले मागे ❗मागण्या पूर्ण....
06:28
error: Content is protected !!