
आंबेगाव तालुक्यातील गोहे येथे टॉवर साठी असणाऱ्या बॅटऱ्या पैकी बारा बॅटऱ्या अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या असून याची तक्रार इश्वर महादु पालवे, टॉवर टेक्नीशीयन रा घोडेगाव यांनी घोडेगाव पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
स्वराज्य संवाद प्रतिनिधी – भिमाशंकर
याबाबत मिळालेली सविस्तर वृत्त असे की, दिनांक 16/07/2025 रोजी दुपारी 03/00 वा चे सुमारास फिर्यादी हे कामावरील साईटवर मौजे पोखरी ता आंबेगाव जि पुणे येथील Altius कंपनीच्या टॉवरला भेट देण्याकामी गेले होते. त्यावेळी टॉवर येथील जनरेटरला डिझेल भरले आणि टॉवरच्या बॅटऱ्या व इतर सर्व यंत्रणा सुस्थितीत असल्याची खात्री केली व घरी निघुन आले.

त्यानंतर दि. 18/07/2025 रोजी दुपारी 01:00 वा सुमारास नेहमीप्रमाणे मौजे पोखरी ता आंबेगाव जि पुणे येथील गोहे साईटर Altius कंपनीच्या टॉवरला भेट देण्यासाठी गेलो असता. त्याठीकाणी टॉवरचे बॅटरी बॅकअपचे वायर निघालेल्या दिसल्या म्हणुन फिर्यादी यांनी बॅटरी बॅकअप रॅक तपासुन पाहिला असता, सदर रँक मध्ये 24 बॅटरी पैकी 12 बॅटरी रॅक मध्ये दिसल्या नाहीत त्यानंतर फिर्यादी यांनी ऑफिसमध्ये घडले प्रकाराबाबत चौकशी केली असता याबाबत कोणासही काहीएक माहीती नसल्याने फिर्यादी यांची खात्री झाली की, बॅटरी बॅकअप रैंक मधील VRLA कंपनीच्या 48 V 600 AH च्या काळ्या रंगाच्या एकुण 12 बॅटऱ्या कोणीतरी अज्ञात चोरट्याने मुद्दाम लबाडीचे इराद्याने स्वताचे आर्थिक फायद्याकरिता चोरी करुन चोरून नेल्या आहेत.

त्यामुळे फिर्यादी यांनी घोडेगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार देऊन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी केंगले हे करत आहेत.