
दर रविवारी ख्रिश्चन धर्माची प्रर्थना आणि लोकांना बोलावुन धर्म परिवर्तनाचे आमिष दाखवते अशी माहिती मिळाल्याने त्याची विचारणा करण्यासाठी गेले असता, शिवीगाळ दमदाटी करून घरासमोरील दगड उचलून फेकून मारून जखमी केले याबाबतची तक्रार फिर्यादी सुनिल मोतीराम गाढवे यांनी दिली असून आरोपी सुजाता टाव्हरे व त्यांचा मुलगा ओमकार टाव्हरे यांचेवर पारगाव (का) येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
स्वराज्य संवाद प्रतिनिधी – पारगाव शिंगवे
याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, दिनांक 20/07/2025 रोजी दुपारी 12:30 वाजताचे सुमारास फिर्यादी यांचा मित्र कमलेश चंद्रकांत तुळे याचा फिर्यादी यांना फोन आला आणि सांगितले की, आपले शिंगवे गावात सुजाता संदिप टाव्हरे यांच्या घरी दर रविवारी खिश्चन धर्माची प्रर्थना आणि लोकांना बोलावुन धर्म परिवर्तनाच्या आमिष दाखवते अशी माहिती मिळाली म्हणुन फिर्यादीचे मित्र ओमकार बाळु वाव्हाळ, सोमनाथ बाळासाहेब गोरडे, कमलेश तुळे असे चौघेजण सुजाता टाव्हरे यांच्या घराजवळ गेले असता ओमकार टाव्हरे हा घरासमोरील ओटयावर उभा होता. त्यांनी आम्हाला पाहिले असता तो लगेच त्याच्या आईला घरात सांगण्यासाठी गेला. तेंव्हा सुजता टाव्हारे या बाहेर आल्या तेंव्हा फिर्यादी व त्यांचे मित्रांनी त्यांना विचारले की, तुमच्या घरात लोकांना बोलावुन धर्म परिवर्तनाबाबत आमिष दाखवत असल्याबाबत आम्हाला माहिती मिळाली आहे.
सदर बाबत सर्वांनी सुजाता टाव्हरे यांना विचारणा केली असता त्या फिर्यादी यांना शिवीगाळ करू लागल्या त्या स्त्री असल्याने आमच्यावर उलट सुलट आरोप करतील यामुळे फिर्यादी यांनी सोबतच असलेला ओमकार वाव्हळ याला त्याच्या मोबाईल फोन मध्ये व्हिडीओ शूटिग काढण्यास सांगितले त्याप्रमाणे त्याने त्याच्या मोबाईल मध्ये व्हिडीओ शुंटिग चालु केली. त्यावेळी सुजाता टाव्हरे व त्यांचा मुलगा ओमकार टाव्हरे यांनी सर्वाना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व सुजाता टाव्हरे यांनी घरासमोरील दगड उचलुन फिर्यादी यांचे डोक्यात फेकून मारला तेंव्हा दगड वाचवताना तो फिर्यादी यांचे उजवे हाताचे पोटरीवर लागला व कमलेश तुळे यांच्या डाव्या हाताच्या बोटाला लागला, तसेच ओमकार वाव्हळ याच्या पाठीवर लागला, त्यानंतर तेथुन फिर्यादी व त्यांचे मित्र सर्वजण बाजुला झाले. तेंव्हा टाव्हरे यांनी मोठमोठ्याने शिवीगाळ दमदाटी करून तुम्हाला कोणता देव वाचवायला येतो असे म्हणुन शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर फिर्यादी व त्यांचे मित्र सर्वजण पारगाव कारखाना पोलीस स्टेशन येथे गेले. आणि झालेली सर्व हकीगत पारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांना सांगितली त्यानंतर घटनेची सर्व शहानिशा करून पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा तपास पारगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नेताजी गंधारे यांचे मार्गदर्शनाखाली चालू आहे.