
भिमाशंकर येथे देवदर्शनासाठी आलेल्या भाविकाची सहा तोळ्याची गळ्यातील चैन चोरट्याने हिसकावून नेली आणि पळून गेला त्यानुसार फिर्यादी निलेश तानाजी पारखी यांनी घोडेगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार देऊन अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
स्वराज्य संवाद प्रतिनिधी – भीमाशंकर
याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, दिनांक 20/07/2025 रोजी फिर्यादी हे कुटुंबासोबत दुपारी 12.30 वा. चे. सुमारास मान-मुळशी गावावरुन भिमाशंकर दर्शनासाठी निघाले आणि भीमाशंकर येथे सांयकाळी 05/00 वा.चे सुमारास पार्किंग नं 04 येथे पोहोचलो त्यानंतर फिर्यादी यांचे ताब्यातील चारचाकी गाडी रोडच्या बाजुला लावुन एस.टी. बसने भीमाशंकर येथे देवदर्शनाकरिता पोहोचले त्यानंतर सर्वांनी देवदर्शन केले देवदर्शन झालेनंतर रात्री 9.00 वा.चे. सुमा एस.टी बसने चार नंबर पार्किंग येथे आलेनंतर फिर्यादी हे गाडीकडे जात असताना एका अज्ञात इसमाने पाठीमागुन येवुन फिर्यादी यांचे गळ्यातील 6 तोळे वजनाची सोन्याची चैन हिसकावुन घेतली व तो दरीच्या दिशेने पळाला फिर्यादी व त्यांचे सोबत असणारे यांनी त्याचा पाठलाग केला परंतु तो अंधाराचा फायदा घेवुन पळून गेला. त्या अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्यादी यांनी तक्रार देऊन घोडेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश पवार हे करत आहेत.