
पुण्यावरून नाशिक कडे निघालेली एस टी बस क्रमांक MH 14 BT 4999 या प्रवासी बसला मालवाहतूक पिक अप क्रमांक MH 06 AG 4377 या पिक अपने मागून धडक दिल्या मुळे अपघात झाला आहे.
स्वराज्य संवाद – ज्ञानेश्वर खिरड
याबाबत मिळालेली सविस्तर घेटनेची माहिती अशी की, पुणे नाशिक महामार्गावरील एकलहरे गावच्या हद्दीत असलेला गतिरोधक या ठिकाणी एसटीबस ड्रायव्हर संतोष कारभारी गायकवाड यांनी प्रवाशांनी भरलेल्या एसटीचे स्पीड सावकाश केले असता मागून येणारी किराणामाल भरून घेऊन चाललेली पिकअप चा ड्रायव्हर संदेश अजित गुप्ता रा. शिनोली ता.आंबेगाव याला पुढे चाललेली एसटी सावकाश झाल्याचा अंदाज न आल्यामुळे एस टी बस ला मागून जोरात धडक दिलेली आहे.

यामध्ये एसटी बसचे मागील साईटने आणि पिकअप चे पुढील साईडने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कोणतीही जीवित हानी झालेली नाही.मात्र पिक अप ड्रायव्हर संदेश अजित गुप्ता, वय २२ वर्षे रा. शिनोली याला डाव्या हाताला व डाव्या डोळ्याच्या वर दुखापत झाली आहे, तर पिकअप मधील ड्रायव्हर सोबत असणारा दुसरा व्यक्ती तुषार कचर साबळे वय २० वर्षे रा. फुलवडे त्याच्या उजव्या हाताला लागले असून त्या दोघांनाही मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

सदर घटनेची मंचर पोलिसांना माहिती मिळताच त्या ठिकाणी मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस जवान नंदकुमार आढारी व पोलीस कॉन्स्टेबल बागुल घटनास्थळी दाखल झाले असून सदर रस्त्यावरील अपघाताची पिकअप व एसटी रस्त्याच्या बाजूला घेतली असून रस्ता सुरळीत केला आहे. सदर घटनेचा पुढील तपास चालू आहे.