जाहिरात
WhatsApp Image 2025-06-01 at 7.03.37 PM (1)

चोरट्याने चोरी करुन चोरुन नेल्याची तक्रार बारामती पुणे ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली आहे.

बारामती – याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी हे डायनामिक्स डेअरी बारामती येथे कंपनीत नोकरी करतात. तर कुटुंबाला हातभार लागावा म्हणून फिर्यादीचे वडील व आई हे दोघे गाया व शेळ्या पालनाचा जोडधंदा व्यावसाय करतात. फिर्यादी यांचा जमीन गट नं ४ जैनकवाडी ता बारामती जि पुणे येथे जनावरांसाठी चारी बाजुने ॲल्युमिनिअमच्या तारेचे कंपाउंड असलेला व त्याला तारेचा दरवाजा असलेला गोठा आहे. त्यात एकुण आठ शेळ्या एक करडू तसेच चार गाया, एक म्हैस, चार कालवडी असुन शेळ्या व गाया असत. फिर्यादी व त्यांचे कुटुंबातील रोज सकाळी 6:00 वा गोठ्यावर जातात व संध्याकाळी 7:00 वाजता शेतातील व गोठ्यातील कामे आवरून घरी येत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मात्र दि. 15/5/2025 रोजी सायंकाळी 7:00 वा चे सुमारास फिर्यादी यांचे आई वडील गोठ्यावरुन गायांची दूध (धारा) काढुन सर्व गाया व शेळ्या व्यवस्थित बांधुन गोठ्याला असलेल्या तारेच्या दरवाजाला कुलुप लावुन घरी आले. मात्र दुसऱ्या दिवशी दि. 16/5/2025 रोजी सकाळी 06: 00 वा फिर्यादी व त्यांचे वडील दोघे गोठ्यावर धारा काढण्यासाठी गेलो असता, त्यावेळी फिर्यादी यांना गोठ्याचे कुलुप तुटलेले व दरवाजा उघडा दिसला त्यावेळी फिर्यादी यांनी गोठ्यात जावुन पाहीले असता. गोठ्यातील चार शेळ्या दिसल्या नाहीत व बाकीच्या शेळ्यांच्या तोंडाला चिकटटेप लावलेला दिसला. त्यानंतर फिर्यादी यांनी गावचे पोलिस पाटील राजु मिंड यांना फोनवरुन गोठ्यातून शेळ्या चोरीला गेल्याबाबत सांगितले. शेळ्या चोरीला गेल्या बाबतची तक्रार अज्ञात व्यक्तीविरुद्ध फिर्यादी यांनी पोलीस स्टेशनला दिली असून पुढील तपास पोलीस हवालदार रावसाहेब गायकवाड करत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!