WhatsApp Image 2025-06-01 at 7.03.37 PM (1)
WhatsApp Image 2025-06-01 at 7.03.37 PM
previous arrowprevious arrow
next arrownext arrow

कासार आंबोली ता. मुळशी जि. पुणे येथील बोस कंपनी जवळ झाडाच्या आडोशाला आरोपी महेद्र मधुकर मारणे यानी बेकायदेशीर पणे गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करताना आढळून आला म्हणून त्यांचेविरुद्ध एन.डी.पी.एस कायदा सन 1985 चे कलम 8 (क) सह 27 अन्वये पौड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कासार आंबोली ता. मुळशी जि. पुणे येथील बोस्ट कंपनी शेजारी एक इसम हा झाडाच्या आडोशाला हातात काहीतरी घेवून ओढत आहे. अशी बातमी मिळाल्यानंतर आम्ही लागलीच दोन लायक पंचाना बोलविणे कामी पो. कॉ. पाटील यांना सांगितले असता पंच आले नंतर पंचाना व पोलीस स्टाफ ला सदर बातमीचा आशय समजावुन सांगितला.

पंचानी सहमती दिल्यानंतर आम्ही व पंच आणि पोलीस स्टाफ खासगी वाहनाने कासार आंबोली येथील बोस्ट कंपनी येथे गेलो असता झाडाच्या आडोशाला एक इसम पांढ-या शर्टाचा व काळी पॅन्ट परिधान केलेला इसम हातामध्ये चिलीम घेवुन ओढत असताना आम्हांला मिळूनआला त्यांसआम्ही जागीच पकडुन त्याला त्याचे नांव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नांव महेद्र मधुकर मारणे असे सांगितले

त्यांची पचा समक्ष अंगझडती घेतली असता त्याचे जवळ गांजासारखा अर्धवट जळालेला आमली पदार्थ, एक काडेपेटी, एकमातीची चिलीम, एक मळकट कापडाची चिंधी असा माल हा आरोपी यांचे कडे मिळून आलातो पो. हवा. ओंबासे यांनी सदरचा मुद्देमाल पंचनामाकरुन पंचासमक्ष जागीच नश्ट करण्यात आलेला आहे. असे फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास पोलीस स्टेशन करत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!