जाहिरात
WhatsApp Image 2025-06-01 at 7.03.37 PM (1)

पार्किंग मध्ये लावलेली मोटरसायकल चोरीला गेल्याची तक्रार ओतूर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी संजय कल्याणराव काळे यांनी तक्रार दिली आहे.

याबाबत मिळालेली अशी माहिती की, दिनांक 25/05/2025 रोजी सकाळी 8:00 वाचे सुमारास फिर्यादी यांचा मेव्हना राहूल याने माऊली कॉम्प्लेक्समधील सलूनचे दुकान उघडले त्यावेळी माझी मोटार सायकल माऊली कॉम्प्लेक्स मधील पार्किंगमध्ये लावलेली होती. फिर्यादी यांनी दिवसभर दुकानात काम केले व सायंकाळी 7:00 वाचे सुमारास पार्किंगमध्ये मोटार सायकल एम. एच.23. बी.ई.0755 हि उभी होती.

त्यानंतर पुन्हा दुकानामध्ये काम केले व रात्रौ 10:00 वाचे सुमारास दुकान बंद करून माऊली कॉम्प्लेक्स येथील घरी जात असतांना फिर्यादी यांना पार्किंगमध्ये मोटार सायकल एम. एच. 23. बी.ई.0755 हि दिसली नाही. म्हणून आजुबाजूला शोध घेतला परंतु सदर मोटरसायकलची काही माहिती मिळाली नाही.

तसेच दुसरे दिवशी पर्यत ओतुर, डुंबरवाडी, व आजु बाजूचे गावात मोटार सायकलचा शोध घेतला असता काही माहिती मिळाली नाही, म्हणून फिर्यादी यांची हिरो स्प्लेडर कंपनीची मोटार सायकल एम. एच. 23.बी.ई.0755 हि मिळून न आल्याने आज्ञात इसमा विरुद्ध फिर्यादी यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पो.हवा सुर्यवशी हे करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!