
प्रकल्पग्रस्ताचा दाखला मिळविणेकामी केलेल्या अर्जाची चौकशी करुन चौकशी अहवाल तहसिलदार शिंदखेडा यांचेकडेस पाठविण्याकरीता मंडळ अधिकारी – छोटू महादू पाटील, भाग तामथरे, ता. शिंदखेडा जि. धुळे यांनी तक्रारदार यांचेकडून 2,000/- रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम चिमठाणा मंडळ अधिकारी कार्यालयात स्विकारली म्हणून त्यांचेवर कायदेशीर कठोर कारवाई होणेसाठी तक्रारदार तरुणाने फिर्यादी नुसार गुन्हा दाखल.
स्वराज्य संवाद प्रतिनिधी
याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी यांना नोकरी मिळविण्यासाठी प्रकल्पग्रस्त दाखल्याची आवश्यकता असल्याने तक्रारदार यांनी प्रकल्पग्रस्तचा दाखला मिळणेकरीता मा. उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन), धुळे यांचेकडे अर्ज केला होता. सदरचा अर्ज चौकशीकामी तहसिलदार शिंदखेडा यांचेकडेस पाठविला असल्याची फिर्यादी यांना माहिती मिळाली.
त्यानंतर फिर्यादी यांनी शिंदखेडा तहसिल कार्यालयात चौकशी केली असता फिर्यादी यांचा अर्ज चौकशीकामी छोटु पाटील, मंडळ अधिकारी, तामथरे यांच्याकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे फिर्यादी हे मंडळ अधिकारी पाटील यांची वेळोवेळी भेट घेवुन त्यांनी सांगितल्याप्रमाणे अर्जाच्या चौकशीकामी आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करुन दिली आहे. परंतु त्यांनी फिर्यादीचे अर्जाचा चौकशी अहवाल तहसिलदार यांचेकडे पाठविला नाही. त्यानंतर मी दि. 18.06.2025 रोजी मंडळ अधिकारी पाटील यांची चिमठाणे येथील मंडळ अधिकारी कार्यालयात भेट घेतली असता त्यांनी फिर्यादी यांचे अर्जाचा चौकशी अहवाल तहसिलदार, शिंदखेडा यांचेकडे पाठविण्याकरीता तक्रारदार यांच्याकडे 3,000/- रुपये लाचेची मागणी केली त्यानंतर फिर्यादी यांनी दि. 19.06.2025 रोजी पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.विभाग, धुळे यांचेकडे तक्रार दिली.त्यानंतर पोलीस उपअधीक्षक श्री. सचिन साळुंखे, पंच व सापळा पथक असे शासकिय वाहनाने व फिर्यादी हे दुचाकीने ला.प्र.वि. धुळे कार्यालयातुन रवाना होवुन चिमठाणा गावाचे शिंदखेडा चौफुलीवर पोहोचली. तेथे फिर्यादी यांच्याकडे डिजिटल व्हॉईस रेकॉर्डर सुरु करुन देवुन एक पंच व फिर्यादी हे मंडळ अधिकारी छोटू पाटील यांची भेट घेण्यासाठी चिमठाणा मंडळ अधिकारी कार्यालयात दुचाकीने पोचले.
तेथे मंडळ अधिकारी छोटु पाटील यांची भेट झाली. तेव्हा त्यांनी फिर्यादी यांचे कामाबाबत बोलणी करून तक्रारदार यांना शिंदखेडा तहसिल कार्यालय येथे येण्यास सांगितले. त्याप्रमाणे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे, दोन्ही पंच व सापळा पथक असे शासकिय वाहनाने व दुचाकीने तेथुन रवाना होवुन शिंदखेडा येथील शिंदखेडा धुळे रस्त्यालगत पुलाजवळ थांबलो. तेथे माझयाकडे डिजिटल व्हॉईस रेकॉर्डर सुरु करुन देवून तक्रारदार व पंच यांना मंडळ अधिकारी छोटु पाटील यांची भेट घेण्यासाठी शिंदखेडा तहसिल कार्यालयात दुचाकीने रवाना केले. तेथे मंडळ अधिकारी छोटु पाटील यांचेशी भेट झाली.
तेव्हा त्यांनी तक्रादाराचे प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र मिळण्याचे प्रकरण दाखवले आणि फिर्यादी यांना पैसे आणले का? अशी विचारणा केली. तेव्हा तक्रार दार यांनी आता पैसे आणले नसल्याचे सांगितले. तेव्हा तक्रारदार यांनी मंडळ अधिकारी यांना विनवणी केली असता त्यांनी तडजोडीअंती 2,000/- रुपये लाचेची मागणी करुन दुसऱ्या दिवशी सोनगीर फाटा येथील स्वागत हॉटेल येथे पैसे घेवुन येण्यास सांगितले.त्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलीस उपअधीक्षक श्री. सचिन साळुंखे, पंच व सापळा पथक हे सोनगीर फाट्याजवळ येवून ठरल्याप्रमाणे फिर्यादी यांना भेटले. त्यानंतर तक्रारदार यांनी मंडळ अधिकारी छोट् पाटील यांना फोन करुन कोठे येवू या बाबत विचारणा केली असता त्यांनी, मंडळ अधिकारी कार्यालय चिमठाणा येथे बोलविले. त्यानंतर तक्रारदार त्या ठिकाणी पोहोचले.
तेथे तक्रारदार यांची मंडळ अधिकारी छोटु पाटील यांचेशी भेट झाली. तेंव्हा तक्रारदार व मंडळ अधिकारी यांचेत कामाबाबत चर्चा झाली. मंडळ अधिकारी छोटू पाटील यांनी तक्रारदार यांचेकडे पैशांची मागणी केली. त्यानंतर लाचेची रक्कम काढून त्यांच्या समोर धरली असता त्यांनी सदर लाचेची रक्कम स्विकारुन मंडळ अधिकारी यांनी मोजुन त्यांच्या खिश्यात ठेवली.
त्यानंतर तक्रारदार यांनी ठरवुन दिलेला इशारा केल्यावर पोलीस उप अधीक्षक साळुंखे व सापळा पथकाने मंडळ अधिकारी छोटु पाटील यांना ताब्यात घेतले. तरी सदर मंडळाधिकारी यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ कलम ७ प्रमाणे सिन्दखेडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी हनुमान गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.