
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असणाऱ्या वळती गावच्या काटवाण वस्तीवर रात्रीच्या वेळी बंद असणाऱ्या घराचा फायदा घेत आज्ञात चोरट्यांनी कटरच्या साह्याने कडी तोडून रोख रक्कम व सोने चांदी असा अंदाजे अडीच लाख रुपयांचा ऐवज नेला चोरून.
स्वराज्य संवाद प्रतिनिधी- मंचर
याबात मिळालेली माहिती अशी की, वळती गावचे ठिकाणी जवळच काटवान वस्ती असून त्याठिकाणी नकूबाई जयराम भोर 85 हि वृद्ध महिला राहते. तर गेल्या पंधरा दिवसापासून सदर वृद्ध महिला आजारी आहेत. तर सदर नकूबाई भोर यांची त्याच त्याठिकाणी स्वत:ची शेती देखील आहे. मात्र शेतीची मशागत करणे शक्य नसल्याने आजीने त्यांची असणारी शेतजमीन दुसऱ्या ओळखीच्या शेतकऱ्याला खंडाने दिली होती. सदर शेत जमिनीच्या खंडाचे पैसे दोन दिवसापूर्वी आजीला सदर शेतकऱ्याने नुकतेच दिले होते. मात्र ते पैसे आजीने आजारी असल्याने घरातच ठेवले होते. आजीचा धाकटा मुलगा ज्ञानेश्वर भोर हे जवळ असलेल्या भागडेश्वर चौकात राहत आहे. आजी आजारी असल्याने मुलगा ज्ञानेश्वर भोर यांच्या घरी त्या राहत होत्या.

नाकुबाई भोर यांचे घर बंद दिसल्याचा फायदा अज्ञात चोट्याने घेतला. अज्ञात चोरटे हे त्या ठिकाणी चोरी करण्याचे उद्देशाने गेले असता, नाकुबाई भोर यांच्या घराशेजारी राहणारे रामहरी भोर आणि बबन भोर यांच्या घरांना देखील सदर अज्ञात चोरट्यांनी बाहेरच्या बाजूने असणऱ्या कड्या लावल्या, त्यानंतर चोट्याने नकूबाई भोर यांच्या घराचे कडी कोयंडे कुलूप हे कटरच्यासह्याने तोडून दारे उघडून घरात प्रवेश केला.

नाकुबाई भोर यांना शेत जमिनीच्या खंडाचे मिळालेले पैसे व इतर असणारे रोख असे एकूण १,०१,५००/- तर दीड तोळ्याची सोन्याची भोरमाळ, त्याच बरोबर अर्धा तोळ्याची आजीची नथ, तीन तोळ्याच्या चांदीच्या मासोळ्या असा अंदाजे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे.
मात्र चोरीची घटना कळतात वळती गावचे पोलीस पाटील प्रकाश लोंढे पाटील यांनी मंचर पोलीस ठाण्यात घडण्याची माहिती दिली. त्यानंतर मंचर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार एस. आर. मांडवे, पो. कॉन्स्टेबल पी. एस गवारी, तर सहकारी फिरोज मोमीन यांनी घटनास्थळी येऊन चोरीच्या घटनेचा पंचनामा केलेला आहे. पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्रीकांत कंकाळ यांचे मार्गदर्शनाखाली होत आहे.

दरम्यान आंबेगाव तालुक्याचे पूर्व भागात चोरीच्या घटना होत असल्याचे दिसून येत आहे. तर गावातील, वाडी वस्तीवरील तरुणांनी, लोकांनी जागरूकता करणे त्याच बरोबर आजू बाजूला काही हालचाली तसेच आप आपल्या परिसरात अपरिचित अनोळखी व्यक्ती दिसल्यास जवळील वस्तीवरील लोकांना फोन द्वारे मेसेज करणे, फोन करणे त्याचबरोबर कुणी संशयित व्यक्ती आढळून आल्यास संबंधित पोलीस स्टेशनशी संपर्क करण्याचे आव्हान भाजपा युवा मोर्चा आंबेगाव तालुका माजी अध्यक्ष, जिल्हा सचिव उत्तर पुणे प्रमोद हरिभाऊ बाणखेले यांनी केले आहे.