
आंबेगाव तालुक्यातील चास गावचे हद्दीत ओढ्यावरील पुलाचे काम चालू आहे. मात्र त्या ठिकाणाहून शेतकऱ्याचे कांदे भरून घेऊन जाणारी मालवाहतूक पिकअप स्लीप होऊन पलटी झाल्याने अपघात झाला आहे, या अपघातात कल्पेश लहु तोत्रे वय २७ रा.कुरवंडी ता.आंबेगाव जि.पुणे, हे मयत झाले असून, रवींद्र महादू बेंगडे, वय – ३५ रा.कुरवंडी ता.आंबेगाव जि.पुणे, रोशन जयसिंग तोत्रे वय २१ रा. कुरवंडी ता.आंबेगाव जि.पुणे पिक अप चालक असे दोघेजण जखमी झालेले आहेत, त्यांना पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले आहे.
स्वराज्य संवाद घोडेगाव – प्रतिनिधी
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दिनांक ०२/०७/२०२५ रोजी रात्री ०९:०० वा.चे सुमारास शेतकऱ्यांनी पिकवलेले कांदे मुंबई येथे घेऊन जात असताना चास गावचे हद्दीत ओढ्यावरील पुलाचे काम सुरू होते, तात्पुरत्या स्वरूपात पर्याय रस्ता होता, परंतु पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे रस्ता चिखलमय झाला होता, पिकअप गाडी नं MH 14 LX 8973 ही गाडी कांद्याचे पिशव्यांनी भरलेली होती. सदर पिकअप गाडी रस्त्यावरून जाताना स्लिप होऊन रस्त्याच्या कडेला असणाऱ्या शेतामध्ये पलटी होऊन अपघात झाला या अपघातात कल्पेश तोत्रे हे मयत झाले असून त्यांच्यासोबत असणारे रवींद्र बेंगडे व पिकअप ड्राइवर रोशन तोत्रे हे जखमी झालेले आहेत त्यांना पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच घोडेगाव पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी तात्काळ हजर झाले व अपघात ग्रस्तांना उपचारासाठी घोडेगाव शासकीय रुग्णालय येथे दाखल केले असून त्यामध्ये एक जण मयत तर दोघे जखमी झाले आहेत. सदर घडलेल्या घटनेचा पुढील तपास घोडेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विठ्ठल वाघ हे करत आहेत.
दरम्यान घडलेली घटना हि अत्यंत दुःखदायक आहे, परंतु सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहे. शेताच्या कडेने जाणाऱ्या रस्त्यावर पावसाच्या पाण्यामुळे चिखल झालेला असतो. तरी मालवाहतूक करणाऱ्या ड्रायव्हर/ चालक यांनी रस्त्याची वस्तुस्थिती पाहून गाडी चालवावी व अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी.
सुरंजन काळे, घोडेगाव, हरिश्चंद्र महादेव संस्थानचे विश्वस्त