
मंचर येथुन महाळुंगे पडवळ कडे टूव्हिलर चालक सुरेश आवटे हे स्वतः चालवित जात असतांना एकलहरे गावाजवळ सांयकाळी मोटार सायकल स्वतः कडून स्लिप होवुन, त्यांचे स्वतःचे चुकीने झालेले अपघाताचे घटनेत, ते मयत झाले असून त्यांचा मुलगा किरण सुरेश आवटे यांनी ICICI Lombard GIC Ltd ह्या विमा कंपनीवर मा.अपर जिल्हा व सत्र न्यायालय, राजगुरुनगर-खेड येथे अपघाता नुकसान भरपाईचा दावा दाखल केला होता. सदर दाव्यामध्ये अपघाताची खोटी घटना तयार करून त्यामध्ये खोटे जबाब व साक्षीदार दिले असल्याचे निदर्शनात आले नंतर त्यानुसार कंपनीचे मुझम्मील अर्शद शेख, ICICI Lombard चे सल्लागार, यांनी मंचर पोलीस स्टेशन येथे शिवाजी जिजाराम काळोखे, नामदेव मारुती बोऱ्हाडे, विठ्ठल विष्णू कदम, किरण सुरेश आवटे त्यांचे विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
स्वराज्य संवाद प्रतिनिधी – मंचर
याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, किरण सुरेश आवटे रा. महाळुंगे, यांचे फिर्यादीवरुन गु. र. नं. 160/2019 कलम 279, 337, 338, 427, 304 (अ) भा.दं.वि., कलम 184 मो. वा. का. चा गुन्हा दिनांक 31/03/2019 रोजी अपघाताचे घटनेनंतर 39 दिवस उशिराने कंटेनर क्र एम एच 14 एफ टी 3666 चे चालकाविरुध्द दाखल आहे. सदर गुन्हयातील फिर्यादीचे वडील सुरेश श्रीपती आवटे यांचा अपघात करणारे कंटेनर क्र एम एच 14 एफ टी 3666 हे ICICI Lombard GIC Ltd विमा कंपनीचे विमाकृत असल्यामुळे फिर्यादी व मयत यांच्या वारसदारांनी ICICI Lombard GIC Ltd विमा कंपनीस गैरअर्जदार मा. अपर जिल्हा व सत्र न्यायालय, राजगुरुनगर-खेड मोटार अपघात दावा प्राधिकरण येथे 30,00,000/- रुपये चा अपघात नुकसान भरपाई करीता दाखल केलेला होता.
सदर अपघाताचे फिर्यादी यांचे विमा कंपनीकडुन अन्वेषण केले असता, असे निदर्शनात आले की, दिनांक 22/02/2019 रोजी सुरेश श्रीपती आवटे (मयत) हे मंचर येथुन महाळुंगे पडवळ कडे टूव्हिलर स्वतः चालवित जात असतांना एकलहरे गावाजवळ सांयकाळी 19.30 वा. सु. मोटार सायकल स्लिप होवुन मोटार सायकलसह खाली पडलेने डोक्यास व छातीस मार लागलेने प्रथम उपचार सिध्दी हॉस्पीटल मंचर येथे केले होते, नंतर दि. 25/02/2019 रोजी रुबी हॉल पुणे येथे केले व नंतर दिनांक 28/02/2019 रोजी YCM हॉस्पिटल पुणे येथे उपचारकामी आणले असता ॲडमिट केले होते. ते दिनांक 05/03/2019 रोजी उपचारा दरम्यान मयत झालेचे डॉक्टरांनी घोषीत केले.
सदरचा अपघात हा सुरेश आवटे (मयत) यांचे स्वतःचे चुकीने झालेला होता. रस्ता अपघात प्रकरणात अपघाताचे तथ्थ्यांचे अन्वेषण, पडताळणी तसेच सदर बाबतीत पत्रव्यवहार करण्यासाठी व ICICI Lombard GIC Ltd. विमा कंपनीची फसवणुक झाल्याचे निष्पन्न झालेले अशा अपघात प्रकरणांमध्ये पुराव्यानुसार निदर्शनात आले असून, त्यांचा अपघात हा कंटेनर क्रं. एम एच 14 एफ टी 3666 चे चालकाने, सदर मोटार सायकल क्रमांक एम एच 14 बि एन 5911 या गाडीने धक्का देवुन केलेला नाही. त्यामुळे सुरेश आवटे (मयत) यांचे वारसांनी अपघात नुकसान भरपाईचा खोटा दाखा दाखल करुन ICICI Lombard GIC Ltd विमा कंपनी, प्रभादेवी मुंबईची फसवणुक केलेली आहे.
तरी दिनांक 22/2/2019 रोजी सायंकाळी 19.30 वाजण्याचे सुमारास मौजे एकलहरे ता आंबेगाव जि पुणे गावचे हद्दीत पुणे नाशिक हायवे रोडवर शंकुतला हॉटेलजवळ सुरेश श्रीपती आवटे (मयत) यांची मोटार सायकल स्वतः स्लिप होवुन, त्यांचे स्वतःचे चुकीने झालेले अपघाताचे घटनेत, ICICI Lombard GIC Ltd विमा कंपनीचे विमीत कंटेनर क्र एम एच 14 एफ टी 3666 व त्यावरील चालक म्हणून शिवाजी जिजाराम काळोखे यांचा अपघातात काही संबंध नसताना, कंटेनर क्रमांक एम एच 14 एफ टी 3666 चे मालक नामदेव मारुती बोऱ्हाडे, कंटेनरवर दर्शविलेला आरोपी स्वतःहा शिवाजी जिजाराम काळोखे, प्रत्यक्षदर्शी दर्शविलेले साक्षीदार विठ्ठल कदम तसेच फिर्यादी किरण सुरेश आवटे यांनी संगनमत करून मयताला ICICI Lombard GIC Ltd या विमा कंपनीकडून विमा मिळविण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनला खोटी माहीती देवून फिर्यादी यांचे ICICI Lombard GIC Ltd या विमा कंपणीची फसवणूक केली आहे. असे फिर्यादी यांनी मंचर पोलीस स्टेशन या ठिकाणी दिलेल्या तक्रारीत नमूद केले असून त्यानुसार भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 420, 120ब, 182, 34 या कलमान्वये फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार सदर घटनेचा तपास मंचर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील धानवे यांचे सह त्यांचे सहकारी करत आहेत.