
मौजे सुपेधर ता आंबेगाव जिल्हा पुणे या गावचे हद्दीत कॉलणी जवळ भिमाशंकर ते मंचर जाणारे रोडवर फिर्यादी तुषार भैय्ये आणि अभिजीत मोरडे, जय कांबळे असे रॉयल एनफिल्ड मोटारसायकल नंबर MH.12.LH.0909 हि भिमाशंकर येथुन मंचर येथे येत असताना कार नंबर MH 14 JU 9642 चा चालक, योगेश उदय गवांदे रा भिमाशंकर ता खेड जि पुणे याने त्याची कार हि हयगयीने अविचाराने रहदारीचे व वाहतुकीचे नियमांकडे दूर्लक्ष करुन भरदाव वेगात समोरील गाडील ओवरटेक करुन फिर्यादी यांचे मित्र अभिजीत मोरडे चालवत असलेल्या बूलेट मोटरयाकलला समोरुन जोरात धडक देवुन अपघात करुन अपघातात फिर्यादी व जय कांबळे याचे गंभीर दुखापतीस कारणीभुत होवुन अभिजीत भरत मोरडे याचे गंभीर दुखापती होवुन मृत्युस कारणीभुत झाला आहे. तसेच दोन्ही वहानांचे नुकसानीस कारणीभुत झाला आहे. म्हणुन त्या कार चालका विरुध्द फिर्यादी तुषार भैय्ये यांनी फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला आहे.
स्वराज्य संवाद प्रतिनिधी – भिमाशंकर
याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, दि 02/07/2025 रोजी फिर्यादी आणि जय संजय कांबळे रा मंचर ता आंबेगाव जि पुणे असे भोसरी येथे कामानिमीत्त गेले होते त्यानंतर तेथुन पुन्हा घरी येत असताना अभिजीत भरत मोरडे याने फिर्यादी यांना फोन करुन आपण रात्री भिमाशंकर येथे देवदर्शनासाठी जावु असे सांगीतले म्हणून फिर्यादी हे घरी येवुन पुन्हा रात्री 08.00 वा मंचर येथे येवुन अभिजीत मोरडे असे त्याचे मित्राची बुलेट मोटारसायकल नं एम एच 12 एल आर 0909 ही घेऊन भिमाशंकर येथे गेलो व तेथे रात्री 02.00 वा. पोहचले व सकाळी भिमाशंकर मंदिरातून दर्शन करुन निघाले असता फिर्यादी यांचा मित्र अभिजीत मोरडे हा मोटरसायकल चालवत होता व फिर्यादी मध्ये बसलेले आणि जय कांबळे हा पाठीमागे बसला होता.
बुलेट मोटारसायकल वर भिमाशंकर ते मंचर रोडने मंचर येथे येत असताना सकाळी 08.30 वा चे सुमारास डिंभे खुर्द गावचे पुढे सुपेधर कॉलनी येथे आलो असता अचानक समोरुन एक निळ्या रंगाची कार ओवरटेक करत आली आणि बुलेट मोटारसायकलला समोरुन जोरात धडक दिली असता फिर्यादी हे रस्त्याच्या खाली गवतात पडले आणि शेजारी अभिजीत मोरडे हा देखील पडलेला होता. फिर्यादीचे पायाला मार लागल्याने उठता येत नव्हते व अभिजीत हा बेशुद्ध होता त्याचे डोक्यातुन रक्त येत होते व पायाला मार लागलेला होता व जय कांबळे हा रस्त्याचे बाजुला पडलेला होता त्या नंतर पायाला मार लागल्याने फिर्यादी हे बेशुद्ध झाले, त्यानंतर दि 03/07/2025 रोजी रात्री 08.00 वाजता शुद्ध आली त्यावेळी फिर्यादी हे मंचर सिध्दी हॉस्पिटल येथे ऍडमिट होते, त्यावेळी मला माझे नातेवाईकांनी सांगीतले की, अपघात झालेनंतर फिर्यादी व त्यांचा मित्र जय कांबळे यास उपचारकामी मंचर येथे ऍडमिट केले व अभिजीत मारडे यास डोक्यात व हातापायास जास्त मार लागल्याने तो जागीच मयत झाला होता व त्यास ॲम्बुलन्सने ग्रामीण रुग्णालय घोडेगाव येथे आनले असता डॉक्टरांनी त्यास तपासुन मयत घोषित केले होते.
तर जय कांबळे व फिर्यादी आय सी यु वॉर्ड मध्ये उपचार घेत आहे. त्यानंतर फिर्यादी यांना सदर चालकाचे नाव योगेश उदय गवांदे रा भिमाशंकर ता खेड जि पुणे असे असुन कार नंबर MH 14 JU 9642 असा असल्याचे समजले आहे तरी त्या कार चालकाविरुद्ध फिर्यादी यांनी गुन्हा दाखल केला आहे. सदर घटनेचा पुढील तपास घोडेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सरला सुरकुले ह्या करत आहेत.