
स्वराज्य संवाद – ज्ञानेश्वर खिरड
याबाबत घटनेची मिळालेली माहिती अशी की, आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावचे हद्दीतील असलेले गीताई हॉटेल मध्ये नितीन लिंबाजी इंगळे हा ५ वर्षेपासून हॉटेलमध्ये कामगार होता आणि हॉटेलच्याच मागे असलेल्या खोलीमध्ये राहत होता.
मात्र दिनांक 26/7/2025 रोजी नितीन इंगळे याने मालकास आज मी कामावर येणार नाही असे सांगितले. आणि सुट्टी घेतली जवळच राहण्यासाठी असल्यामुळे दुपारी नितीन हा जेवण्याकरिता आला नाही म्हणून हॉटेलमधील कामगार नाना मेंगाळ हे बोलविण्यास गेले असता नितीन यांनी दरवाजा उघडला नाही. तेव्हा नाना इंगळे यांनी हॉटेल मालकास बोलवले आणि दार उघडण्यासाठी त्याला आवाज देऊ लागले मात्र आत मधून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता.
तर मालक सागर वाघ व त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांना काही शंका येऊ लागल्याने त्यांनी गावचे पोलीस पाटील व गावातील इतर लोकांना बोलावून दरवाजा तोडून आत पाहिले असता नितीन लिंबाजी इंगळे रा.देवपूर पो. दुधा ता. जि. बुलढाणा याने दोरीच्या सह्याने गळफास घेतलेला असल्याचे दिसले.
त्यानंतर तेथील जमा असणाऱ्या लोकांनी एकमेकांच्या मदतीने त्याला खाली उतरविले आणि मंचर पोलीस स्टेशन यांना संपर्क केला असता तात्काळ त्या ठिकाणी सहाय्यक फौजदार संतोष मांडवे पोलीस हवलदार कुलवडे तसेच पोलीस कॉन्स्टेबल ढोबळे त्या ठिकाणी पोहचले, घटनेचीच्या ठिकाणी तात्काळ ॲम्बुलन्स यांना फोन करून बोलावून सदर नितीन इंगळे यांना उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे उपचारासाठी आणण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यास तपासून मयत झाले असल्याचे सांगितले.
सदर घडलेल्या घटनेबाबतची माहिती सागर वाघ यांनी मंचर पोलिसांना कळविली असून त्यानुसार पुढील कायदेशीर काम चालू आहे.
दरम्यान नितीन इंगळे यांनी आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही तर या घटनेचा पुढील तपास मंचर पोलीस स्टेशचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.