जाहिरात
WhatsApp Image 2025-06-01 at 7.03.37 PM (1)

पेठ येथील जेष्ठ व्यक्तीच्या हातातील पैशाची पिशवी चोरणाऱ्या चोरास अटक

स्वराज्य संवाद प्रतिनिधी – मंचर

पेठ ता. आंबेगाव जि पुणे येथे दिनांक २३/७/२०२५ रोजी दुपारी १.३० वाजण्याचे सुमारास श्रीमती गिताबाई शंकर काळे वय ७५ वर्षे व्यवसाय घरकाम रा. कारेगाव ता. आंबेगाव जि.पुणे सदर महिलेने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पेठ ता. आंबेगाव जि पुणे या बँके मधून स्वतःच्या बचत खात्यातून १२,०००/- रूपये रोख रक्कम काढली ही रक्कम व बँकेचे पासबूक गिताबाई काळे यांनी त्यांचा सख्खा भाऊ शिवाजी भामा नवले रा.भावडी ता. आंबेगाव जि. पुणे यांच्या हातातील पिशवीमध्ये ठेवायला दिली.

त्यानंतर गिताबाई व त्यांचा भाऊ शिवाजी नवले हे दोघेजण कारेगाव इथे आपल्या घरी परतत असताना गावातील बाजार पेठमधील रोडने पायी चालत जात होते. त्यांच्या पाठोपाठ आलेल्या मोटार सायकलवरील दोन अनोळखी इसमांनी शिवाजी नवले यांच्या हातातील पैशाची पिशवी जबरदस्तीने दमदाटी करून हिसकावून नेली होती. त्याबाबत दिनांक २५/७/२०२५ रोजी गिताबाई शंकर काळे यानी मंचर पोलीस स्टेशनला कळवून तक्रार दिली नंतर मंचर पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.झालेल्या चोरीचे गंभीर प्रकारामुळे मा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल मांडवे साो यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी तपास पथकाची नेमणूक करून सदरचा गुन्हा उघडकीस आणणेकरीता तपास पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना योग्य त्या सुचना दिल्याने दिनांक २५/७/२०२५ रोजी सदरची चोरी करणारे इसम त्यांचेकडील मोटार सायकलसह मंचर पोलीस स्टेशन ह‌द्दीत संशयितरित्या मिळून आले असून त्यापैकी एक इसम पळून गेलेला आहे.

मोटार सायकलसह एक इसमास ताब्यात घेवून त्याचेकडे चौकशी करून खात्री केली असता पेठ ता आंबेगाव जि पुणे येथिल चोरीचा गुन्हा सदर आरोपीने केला असल्याचे निष्पन्न झाले असून त्यास दिनांक २६/७/२०२५ रोजी गुन्हयात अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव गोगला डेनियल बिलआप्पा वय ५६ वर्षे रा. राजमंगलम, वेल्लीविवेकम, चेन्नई असे असून त्याचेकडून गुन्हयात चोरून नेलेल्या रोख रक्कमेपैकी ६०००/- रूपये रोख रक्कम व २५,०००/- रूपये किंमतीची युनिकॉन कंपणीची टूव्हीलर मोटार सायकल असा एकूण ३१,०००/-रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.अटक आरोपीची दिनांक २६/७/२०२५ पासून ते दिनांक २९/७/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे.

पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान अटक आरोपीकडे चौकशी केली असता अटक आरोपीने व त्याचे साथिदार आरोपीने मंचर पोलीस स्टेशन हद्दीत २, पारगाव कारखाना पोलीस स्टेशन हद्दीत १, वडगाव पोलीस स्टेशन ह‌द्दीत १ असे एकूण ४ गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे. संबंधित पोलीस स्टेशनला चारही गुन्हे दाखल आहेत. अटक आरोपी व त्याचा साथिदार आरोपी हे परराज्यातातील चेन्नई येथिल राहणारे असून त्यांनी महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेर अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केले असल्याची दाट शक्यता आहे.

त्याबाबत अटक आरोपीकडे तपास करण्यात येणार आहे.सदरची कामगिरी मा पोलीस अधिक्षक श्री संदिप गिल्ल साो, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री रमेश चोपडे साो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी खेड विभाग खेड, श्री अमोल मांडवे साो, मा पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ मंचर पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर, पोलीस उप निरीक्षक यशवंत यादव, पोलीस हवालदार प्रणयकुमार उकीर्डे, पोलीस हवालदार संजय नाडेकर, पोलीस अंमलदार अजित पवार, योगेश रोडे, अविनाश दळवी, हनूमंत ढोबळे, सुनिल काठे यांनी केली असून गुन्हयाचा तपास पोलीस उप निरीक्षक यशवंत यादव हे करीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!