जाहिरात
WhatsApp Image 2025-06-01 at 7.03.37 PM (1)

भारतीय सैन्य दलातून रजा घेऊन पुढील शिक्षणाची परीक्षा देण्यासाठी सुट्टीवर आलेल्या जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

आंबेगाव तालुक्यातील राजपूर या गावातील जम्मू काश्मीर या ठिकाणी बॉर्डर रोड्स ऑर्गनाइजेशन (Border Roads Organisation) बी.आर.ओ मधील ड्राइंग & एस्टेब्लिशमेंट सुपरवाइजर (Drawing & Establishment Supervisor) डी. ई. एस. या पदावर असणारे कु. सुभाष अनिल दाते वय २७ वर्षे, रा. राजपूर, ता. आंबेगाव यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.

स्वराज्य संवाद प्रतिनिधी – श्री क्षेत्र भीमाशंकर

याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, सुभाष अनिल दाते हे मामाच्या गावी राजपूर या ठिकाणी लहानपणापासूनच राहावयास होते तसेच त्यांचे शिक्षण देखील त्या ठिकाणी झाले. दाते त्यांचा संभाळ मामा चंदू सदू लोहकरे आणि आई सुमन अनिल दाते यांनी केला.

सुभाष दाते यांनी प्राथमिक शिक्षण राजपूर येथे घेतले तर पुढील बारावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी शिनोली येथे पूर्ण घेतले त्यानंतर माणिकडोह येथे आय टी आयचा कोर्स पूर्ण केला. तर शिक्षण झाल्यानंतर मामाच्या गावी परत आले आणि मामा, आई, मावशी व स्वतःच्या इच्छेनुसार देशाची सेवा करावयाची म्हणून दाते यांनी मनात इच्छा बाळगली आणि त्यानंतर त्यांनी भारतीय सैन्य दलात भरती होण्याची तयारी सुरू केली. मनामध्ये इच्छा जिद्द आणि चिकाटी असल्यामुळे ते जम्मू काश्मीर येथे (बॉर्डर रोड्स ऑर्गनाइजेशन – Border Roads Organisation) बी.आर.ओ. मधील ड्राइंग & एस्टेब्लिशमेंट सुपरवाइजर (Drawing & Establishment Supervisor) डी. ई. एस. या पदावर भरती झाले आणि स्वतःचे व कुटुंबाचे स्वप्न साकार करून देश सेवेसाठी रुजू झाले. मात्र सुभाष दाते यांचे लग्न झाले नव्हते.

दरम्यान दोन वर्षापासून दाते हे जम्मू काश्मीर येथे सैन्यात (बॉर्डर रोड्स ऑर्गनाइजेशन – Border Roads Organisation) बी.आर.ओ मधील ड्राइंग & एस्टेब्लिशमेंट सुपरवाइजर (Drawing & Establishment Supervisor) डी. ई. एस. या पदावर कार्यरत होते, मात्र त्यांना पुढील परीक्षेचे पेपर द्यावयाचे असल्याने दाते यांनी पाच दिवसांपूर्वीच रजा घेऊन आपल्या मामाच्या गावी राजपुर या ठिकाणी आले होते.

मात्र दि. 30/07/2025 रोजी सकाळी 8.00 वाजताचे सुमारास सुभाष दाते हे झोपेतुन उठले तेंव्हा त्याचे छातीत अचानक दुखू लागल्याने त्यांची आई सुमन अनिल दाते यांनी शेजारील तुकाराम फलके यांना आवाज दिला असता फलके हे त्यांचे घरी आले त्यानंतर सुभाष दाते यांनी सांगितले की, माझे छातीत दुखत असुन छातीत खुप वेदना होत आहेत. तर दाते यांना घाम देखील येत होता, त्यानंतर लगेचच फलके यांनी गावातील अक्षय अशोक लोहकरे यांना गाडी घेऊन बोलावले आणि त्यांचे मालकीचे इको गाडीतुन तुकाराम फलके, त्यांची आई सुमन दाते, मावशी भामा चपटे, मामा चंदू लोहकरे असे सुभाष दाते यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय तळेघर येथे घेऊन गेले, त्यानंतर तेथील उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी दाते यांना तपासुन पुढील उपचारकामी तेथील सरकारी ॲम्बुलन्सने ग्रामीण रुग्णालय घोडेगाव ता. आंबेगाव येथे तात्काळ पाठविले, घोडेगाव या ठिकाणी आल्यानंतर तेथील डॉक्टरांनी त्यांची इ.सी.जी तपासणी केल्यानंतर सुभाष दाते यांची कोणतीच हालचाल होत नसल्याने मयत झाल्याचे फलके यांना सांगितले.

तरी सुभाष दाते यांना राजपूर येथील शासकीय इतमात अनेक पोलिस जवानांच्या हजेरीत अंत्यसंस्कार करण्यात आले, तर दाते यांच्या मागे त्यांची आई, मावशी, मामा असा परिवार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!