सह्याद्री प्रतिष्ठान शिवजन्मभूमी यांच्या माध्यमातून आयोजीत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जगातील पहिल्या भव्य अश्या पालखी सोहळ्याचे आयोजन (शिवरथ यात्रा) सालाबाद प्रमाणे ०३ फेब्रुवारी २०२४ ते ०७ फेब्रुवारी २०२४ रोजी करण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे या शिवरथ यात्रेचे या वर्षीचे हे अविरत चौदावे वर्ष आहे.
श्री शिवजन्मस्थळ, किल्ले शिवनेरी ते रायगड असा प्रवास सुरू असताना मंचर शहरात आगमन झाल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या पादुकांना अभिषेक करण्यात आला. या निमित्ताने मंचर शहरातून ढोल ताशे, पारंपरिक वाद्यांची भव्य मिरवणूक तसेच फुलांची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. महिला भगिनींमार्फत औक्षणही करण्यात आले. छत्रपतींच्या पादुका व मूर्ती पालखीत विराजमान होऊन रायगडकडे प्रस्थान करत असताना या कार्यक्रमासाठी ची विशेष व्यवस्था विश्व हिंदू परिषद बजरंग दल, मंचर तसेच शिवरथ यात्रा उत्सव समिती, सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान आणि सह्याद्री प्रतिष्ठान शिवजन्मभुमी यांच्यामार्फत करण्यात आली होती.याप्रसंगी नगरपंचायत मंचर चे विद्यमान सदस्य स्वप्निल बेंडे, ग्रामपंचायत पेठ चे विद्यमान सरपंच राम तोडकर, मिनाक्षी बेंडे, शितल तोडकर, सुनिता थोरात, सुरेखा थोरात, मंचर शहर तसेच पंचक्रोशीतून इतिहास प्रेमी, शिवप्रेमी, सह्याद्री प्रतिष्ठान आंबेगाव तालुका च्या दुर्ग सेवकांनी आणि गिरीदुर्ग प्रेमींनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.1
स्तुत्य उपक्रम