प्रतिनिधी – सुरंजन काळे
चिंचोली (को) येथे दिवाळीनिमित्त कपालेश्वर एज्युकेशन सोसायटी कडून जगदीशचंद्र महिंद्रा हायस्कूल वस्तीगृहातील मुलांना दिवाळी फराळ वाटप केले असल्याची माहिती शालेय व्यवस्थापण समिती चे अध्यक्ष श्री किसन कोकणे यांनी दिली .कपालेश्वर एज्युकेशन सोसायटीचे असणारे सहसचिव श्री निलेश झोडगे यांच्या संकल्पनेतून तसेच संचालक याच्या मार्गदर्शनाने आदिवासी वसतिगृहात असणारे विद्यार्थ्यांना शनिवारी पासून दिवाळी सुट्टी लागत असल्याने आदिवासी भागातून विद्यार्थी चिंचोली (को) येथे वसतिगृहात राहत असतात आर्थिक परिस्थिती गरीब असल्याने त्यांची देखील दिवाळी गोड करण्याच्या दृष्टीने दिवाळी फराळ वाटप केले असल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विलास (आप्पा) कोकणे यांनी सांगितलेया प्रसंगी वस्तीगृहाच्या अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर कोकणे खरेदी-विक्री संघाचे संचालक दत्तात्रय कोकणे तसेच खजिनदार सत्यवान रोकडे सचिव बाळासाहेब रोकडे मुख्याध्यापक खराडे सर सहसचिव निलेश झोडगे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद कोकणे यांनी केले.