प्रतिनिधी – दिपाली खिरड
राणा प्रताप प्रतिष्ठान च्या वतीने आंबेगाव तालुक्यातील विविध अंगणवाड्यांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी राणा प्रताप प्रतिष्ठानचे पदाधिकारी ‘ कार्यकर्ते उपस्थित होते.
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या राणा प्रताप प्रतिष्ठान आंबेगाव तालुका यांच्या वतीने १५ ऑगस्ट च्या निमित्ताने आंबेगाव तालुक्यातील मंचर गावातील १७ अंगणवाड्यांना व महात्मा गांधी प्राथमिक शाळा मंचर यांना खाऊ वाटप करण्यात आले. तसेच पळ स्टिका येथील अनाथ आश्रम व पारधी वस्तीवर जाऊन देखील खाऊ वाटप करण्यात आले. राणा प्रताप प्रतिष्ठान गेल्या आठ वर्षापासून 15 ऑगस्ट व 26 जानेवारीला जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, आश्रम शाळा या ठिकाणी खाऊ वाटपाचे काम करत असून मंचर शहर व परिसरात सापडणाऱ्या बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचे कामही ही संघटना करत आहे. पुढील काळात अनेक गरजू लोकांची मदत करणार असल्याचे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते संग्राम सावंत महेश माशेरे विशाल मोरडे सागर सोमवंशी सुजय धरम रवींद्र इंगोले संतोष माशेरे अनिकेत येळवंडे संदीप सावंत तुषार बाणखेले यांनी सांगितले. तसेच पुढील काळात तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवून विविध विषयांवर जनजागृतीचे काम करणार असल्याचे प्रतिष्ठानचे वतीने सांगन्यात आले.