प्रतिनिधी – सुरंजन काळे, घोडेगाव
तीर्थक्षेत्र श्री हरीचंद्र देवस्थान ते बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील भगवान शिवाचे पावन भूमीत असलेल्या आंबेगाव, जुन्नर, खेड तालुक्यातील शिवभक्तांनी कावड यात्रेचे गुरुवार दि २९ ऑगस्ट ते शुक्रवार ३० ऑगस्ट असे दोन दिवसीय आयोजन केले असल्याचे भीमाशंकर कावड यात्रा नियोजन समिती समन्वयक आणि विश्व हिंदू परिषद भीमाशंकर जिल्हा अध्यक्ष श्री. प्रशांत काळे पाटील यांनी सांगितले. या कावड यात्रेचे प्रस्थान घोडेगाव येथून गुरुवार दि.२९ ऑगस्ट रोजी श्री हरिश्चंद्र महादेव मंदिर संस्थांनच्या सर्व तिर्थकुंडातील जल कावडीत घेऊन सकाळी ७ वाजता प्रारंभ झाला.घोडेगाव पासून भिमाशंकर पर्यंत ठीक ठिकाणी कावड यात्रेचे उत्स्पूर्त पणे स्वागत होणार आहे. तर कावड यात्रा समारोप शुक्रवार दि.३० ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजता भीमाशंकर येथे विश्व हिंदू परिषदेच्या ६० व्या वर्धापन दिना निमित्त हिंदू संमेलनाने होईल. पहिल्यांदाच व्यापक प्रमाणात होत असलेल्या या यात्रेचे कुतूहल तिन्ही तालुक्यात आहे. तरी या यात्रेमध्ये सर्व शिवभक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन कावड यात्रा नियोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.