प्रतिनिधि – सुरंजन काळे , घोडेगाव
घोडेगाव (ता.आंबेगाव) घोडेगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची 74 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष श्री सखाराम हरिभाऊ काळे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली सभा सुरू होऊन प्रस्तावना संस्थेचे संचालक श्री म्हातारबा ठकाजी कोकणे यांनी प्रस्तावना करत असताना संस्थेमध्ये जे माजी चेअरमन झाले त्यांनी अतिशय कठीण परिस्थितीमध्ये संस्था टिकवल्या त्यामुळे संस्था आता चांगल्या प्रकारे चालत असल्याचे सांगितले संस्थेचे भाग भांडवल पस्तीस लाख रुपये असून संस्था पीक कर्ज वाटप मध्य मुदत गाय गोठा कर्ज वाटप करत असून चालू वर्षे 17 लाख 43 हजार रुपये इतका उच्चांकी नफा झाला असून चालू वर्षी सभासदांना 15% डिव्हीडंट दिला जाईल असे देखील सांगितले संस्था गेली दहा ते पंधरा वर्षे झाले सभासदांना 14 ते 15 टक्के डिव्हिडंट वाटप करत असते असे प्रस्तावनामध्ये सांगितले त्यानंतर विषय पत्रिकेनुसार सभेला सुरुवात करण्यात आली विषय पत्रिकेवरील विषय संस्थेचे सचिव श्री सुरंजन काळे यांनी वाचून दाखवून प्रत्येक विषयामध्ये चर्चा झाली त्यानंतर आभार मानत असताना ज्येष्ठ सभासद डॉक्टर केशवराव काळे यांनी संस्था चांगल्या प्रकारे चालत असून संस्थेने नवीन व्यवसाय चालू करण्यास प्रयत्न करावे त्यामध्ये डिजिटल युगामध्ये संस्थेने फवारणी यंत्र (ड्रोन)खरेदी करून शेतकरी सभासदांना कमी दारामध्ये उपलब्ध करून द्यावे असे मत मांडले तसेच मा. सभापती कैलास (बुवा)काळे यांनी संस्था चांगल्या प्रकारे सभासदांना कर्ज पुरवठा करत असून संस्थेचे कर्मचारी व संचालक मंडळ यांचे आभार मानले सभेत उपस्थित असणारे आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष श्री तुकाराम नामदेवराव काळे मा. अध्यक्ष अजित शेठ काळे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री सोमनाथ काळे विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक श्री.यशराज शेठ काळे घोडेगाव क्रमांक 1 विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन श्री सुरेश शेठ काळे तसेच संत सावता माळी पतसंस्थेचे चेअरमन पुरुषोत्तम जी भास्कर शरद सहकारी बँकेचे संचालक सुदाम शेठ काळे हे उपस्थित होते आभार मानत असताना संस्थेचे व्हॉइस चेअरमन श्री बाळासाहेब कोंडाजी काळे यांनी उपस्थित सभासद व मान्यवर मंडळींच्या आभार मानून सभा संपल्याचे जाहीर केले