प्रतिनिधी – सुरंजन काळे
घोडेगाव (ता .आंबेगाव)घोडेगाव शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी कु. अभिजित सुनील काळे व उपाध्यक्ष पदी कु आदित्य भगत यांची निवड झाली असल्याचे आंबेगाव तालुका विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अँड प्रेम प्रशांत थोरात यांनी सांगितले . तसे नियुक्ती पत्र भिमाशंकर साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे याच्या उपस्थितीत दिले.
तसेच नवनियुक्त घोडेगाव विद्यार्थी शहर अध्यक्ष कु अभिजित काळे यांनी आभार मानत असताना घोडेगाव शहरात विद्यार्थी संघटन वाढवून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी असणाऱ्या शासकीय योजनांची माहिती दिली जाईल असे मत व्यक्त केले तसेच महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांचे आभार मानले. या प्रसंगी आंबेगाव तालुका देखरेख संघाचे अध्यक्ष माननीय सखाराम हरिभाऊ काळे पाटील ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अनिकेत जाधव, निलेश थोरात, सोमनाथ काळे ,सोपान सखाराम काळे यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.