कानसे (ता. आंबेगाव) येथील रहीवासी असलेल्या परंतू सध्या खेड तालुक्यात कार्यरत असणाऱ्या शिक्षिका सुवर्णा भिमाजी धादवड यांना नुकतेच गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. राजगुरुनगर येथील खांडगे लॉन्स या मंगल कार्यालयात खेड तालुका पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुका गुणवंत शिक्षक पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकतानगर चाकण येथील जिल्हा परिषद शाळेतील हरहुन्नरी, उपक्रमशील, तंत्रस्नेही शिक्षिका सुवर्णा धादवड यांना उत्कृष्ठ शैक्षणिक कार्याबद्दल तालुक्याचे आमदार दिलीपशेठ मोहीते, गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले, विस्तार अधिकारी जीवन कोकणे, श्रीरंग चिमटे, केंद्रप्रमुख रोहीदास रामाणे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुवर्णा धादवड यांनी शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली आहे. मुलींच्या शिक्षणाकरीता सन्मान मायमाऊलीचा, अक्षर मेहंदी, सुंदर हस्ताक्षर, प्रश्नमंजुषा, रांगोळी, वक्तृत्त्व, पाढे व स्पेलिंग पाठांतर, सामान्यज्ञान वाढवा असे विविध उपक्रम राबविले आहेत. तसेच सोशल मिडियाच्या माध्यमातून विविध शैक्षणिक व्हिडीओ, माहिती, चित्रे विद्यार्थ्यांपर्यंत पोचवून अध्यापनात रंजकता आणली आहे. खेळ, कला, क्रीडा, कार्यानुभव या विषयांची गोडी वाढवण्यासाठी माती व कागदापासून विविध वस्तु, चित्रे, मातीची भांडी बनवली आहेत. विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणूनही त्यांची शाळेत ओळख आहे. सुवर्णा धादवड या उच्चशिक्षित असून त्या पुणे विद्यापीठात पीएच डी चा अभ्यास करत आहेत. मंथन प्रज्ञाशोध, शिष्यवृत्ती, NAS, या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवली आहे. त्यांना वाचन लेखनाची आवड असल्याने त्यांचे अनेक लेख व शोधनिबंध प्रकाशित आहेत. इतर शाळांमध्ये जाऊन संस्कारक्षम कथा – कवितांमधुन त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. तालुका विज्ञान प्रदर्शनात त्यांच्या प्रकल्पाला विशेष प्राविण्य मिळाले होते. शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेतही त्यांना जिल्हा पातळीवर गैरविण्यात आले आहे. तसेच तालुका व जिल्हा स्तरावर तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी अनेकदा उत्कृष्ठ कामगिरी पार पाडली आहे. त्यांच्या या उत्कृष्ठ शैक्षणिक कार्याबद्दल आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आल्याने सर्वच स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कपालेश्वर एज्युकेशन सोसायटी कडून जगदीश चंद्र महिंद्रा हायस्कूल वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ वाटप
प्रतिनिधी - सुरंजन काळे चिंचोली (को) येथे दिवाळीनिमित्त कपालेश्वर एज्युकेशन सोसायटी कडून जगदीशचंद्र महिंद्रा हायस्कूल वस्तीगृहातील मुलांना दिवाळी फराळ वाटप...
Read more