प्रतिनिधी – किशोर ठोसर
घोडेगाव; ता.११ फेब्रुवारी २०२४.’स्पार्क मिंडा फाउंडेशन’ आणि ‘समर्थ दिव्यांग कल्याणकारी संस्था-आंबेगाव तालुका’ यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांसाठी मोफत दिव्यांग सशक्तीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिरात सुरुवातीची तपासणी तसेच मोजमाप हे गुरुवार, दिनांक १५ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ०९ वाजेपासून दुपारी ०३ वाजेपर्यंत श्री हरिश्चंद्र देवस्थान संस्थान हॉल घोडेगाव, ता. आंबेगाव या ठिकाणी आयोजित केले आहे. त्यासोबतच तपासणी करुन मोजमाप दिलेल्या दिव्यांग बांधवांसाठी मोफत कृत्रिम पाय, हात, कॅपिलर, कुबड्या, काठी, वॉकर, यू.डी.आय.डी (UDID) कार्ड रजिस्ट्रेशन तसेच साहित्य वाटप हे शुक्रवार, दिनांक २३ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ०९ ते सायंकाळी ०४ या वेळात ‘समिट स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड’ गट नंबर २७७,२७८/१, आळंदी फाटा, हॉटेल भंडारा रेस्टॉरंट समोर, सीएनजी पंपाजवळ, नाणेकरवाडी, चाकण. तालुका-खेड या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर रोजगानिर्मिती संधी, व्यवसाय मार्गदर्शन व सहकार्य यासारख्या अनेक सुविधा दिव्यांग बांधवांना या शिबिरा मार्फत प्राप्त होणार आहेत.या शिबिराच्या संदर्भात अधिक माहितीसाठी समर्थ दिव्यांग कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष सुनील दरेकर यांना ७७६७०८७४८७ या क्रमांकावर संपर्क साधावा.