प्रतिनिधी, ता. १३ फेब्रुवारी २०२४; ग्रामोन्नती मंडळ कृषि विज्ञान केंद्र- नारायणाव आयोजित भव्य जागतिक दर्जाच्या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरबद्दल देण्यात आलेले “ग्रामोन्नती कृषी सन्मान पुरस्कार-२०२४” हे जुन्नर, आंबेगाव तसेच पारनेर तालुक्यातील विविध मान्यवरांना प्रदान करण्यात आले. पुरस्कार प्राप्त झालेले मान्यवर पुढीलप्रमाणे: “प्रगतिशील शेतकरी पुरस्कार”- ज्ञानेश कुटे (नेतवड, तालुका-जुन्नर) यांनी गाव मौजे गिरवली (ता. आंबेगाव) येथे एक डोंगर खरेदी करून त्यामध्ये सपाटीकरण केल्यावर एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आयुर्वेदिक जांभूळफळाची लागवड २०१३-१४ साली करण्यात आली. त्यानंतर त्याची योग्य निगा राखून सन २०१६ -१७ पासून झाडांना फळधारणा झाल्यानंतर त्याची योग्य प्रतवारी, पॅकिंग, जाहिरात करून पुणे व मुंबई येथील मार्केटमध्ये विक्री करण्यात येत आहे. त्याचबरोबर बाजारभाव चढ उतार यावर लक्ष ठेवून बाजारभाव कमी झाल्यानंतर तात्काळ ते जांभळाचे प्रोसेसिंग कडे वळले व जांभळाचा उच्च प्रतीचा शुद्ध रस (ज्यूस) तयार करण्यास सुरुवात केली व सदर ज्यूस हा वर्षभर विक्रीसाठी विविध ठिकाणी पाठवण्यात येतो. म्हणजेच फळ विक्री व प्रक्रिया या दोन्ही गोष्टींची पद्धतशीर सांगड घालून उत्तम व्यवस्थापन येथे करण्यात येते. त्याचबरोबर फळ लागवडीचा नाविन्यपूर्ण प्रयोग करून थायलंडची नवीन व्हरायटी “रामबुतान” याची सुद्धा लागवड सदर शेतीत करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त “प्रगतशील महिला शेतकरी पुरस्कार” सौ. सुनंदा चासकर (लांडेवाडी, ता.आंबेगाव), “महिला उद्योजक पुरस्कार”- सीमा डोंगरे (आर्वी-ता. जुन्नर), “कृषी उद्योजक पुरस्कार”- अरुण उचाळे (शिरापूर, ता. पारनेर), “प्रगतशील पशुसंवर्धन शेतकरी पुरस्कार”- अनिल वाघ (पहाडदारा, ता. आंबेगाव), “नैसर्गिक शेती शेतकरी पुरस्कार” बाळू वडेकर (पिपरी, ता. आंबेगाव), “मिलेट शेतकरी पुरस्कार” बाळू बेंडारी (पोखरी, ता. आंबेगाव), आणि “कृषी पत्रकारीतेमधे” अशोक खरात (पत्रकार- खोडद, तालुका जुन्नर) या मान्यवरांची वर्णी लागली आहे.प्राप्त पुरस्कारांच्या अनुषंगाने सर्व पुरस्कार विजेते शेतकरी पुरुष व महिला भगीनिंची सर्वत्र वाहवा होत आहे.
कपालेश्वर एज्युकेशन सोसायटी कडून जगदीश चंद्र महिंद्रा हायस्कूल वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ वाटप
प्रतिनिधी - सुरंजन काळे चिंचोली (को) येथे दिवाळीनिमित्त कपालेश्वर एज्युकेशन सोसायटी कडून जगदीशचंद्र महिंद्रा हायस्कूल वस्तीगृहातील मुलांना दिवाळी फराळ वाटप...
Read more