प्रतिनिधी – सुरंजन काळे
घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील ग्रामदैवत श्री मुक्तादेवी मंदिराचा पुनःप्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा १९ ते २१ फेब्रुवारीदरम्यान आयोजित केला आहे. तीनही दिवस विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती श्रो मुक्तादेवी ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष संतोष पिंगळे व उद्योजक सावता वाघमारे यांनी दिली.या मंदिराचे बांधकाम गेली चार वर्षे सुरू होते. तोन कोटीहून अधिक रक्कम खर्च करून लोकवर्गणी व देणगीतून हे मंदिर उभे राहिले आहे. संपूर्णपणे संगमरवर दगडात हे मंदिर बांधकाम झाले आहे. मंदिर व सुशोभोकरण करून गावाच्या वैभवात मोठी भर पडली आहे. २१ रोजी प्राणप्रतिष्ठा करवीर पीठ जगद्गुरू शंकराचार्य प. पू. स्वामी विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते व पं. प्रसाद जोशी यांच्या उपस्थितीत विधींचे पौराहित्य होणार आहे. १९ रोजी कलशाची भव्य मिरवणूक श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर ते श्री मुक्तादेवी मंदिर, अशी होणार आहे. पिवळ्या रंगातील साडीतील कलशचारो महिला याही या मिरवणुकीचे मोठे आकर्षण आहे. श्री मुक्ताई स्मरणिकेचे प्रकाशन या वेळी होणार आहे. या वेळी कृष्ण महाराज राऊत, उद्धवजी महाराज मंडलिक, पुरुषोत्तम महाराज पाटील यांची तीन दिवस सायंकाळी कीर्तन होणार असून, व सर्वांसाठी रोज अन्नप्रसाद राहणार आहे.सध्दर्मप्रेमी सज्जन हो, सर्व भक्तांच्या सहकार्याने श्री मुक्तादेवी ग्रामविकास संस्था (नारोडी) पिढ्यानपिढ्या सामाजिक बांधिलकी जपत धर्म प्रबोधनाचे कार्य अविरत करीत आहे. धर्मो रक्षति रक्षितः या उक्तीप्रमाणे तुम्ही धर्माचे रक्षण करा, धर्म तुमचे रक्षण करेल.मंदिर म्हणजे भक्तांमध्ये दया, क्षमा, शांती, वृध्दिंगत करुन आत्मबल निर्माण करणारे उर्जास्त्रोताचे पवित्र स्थान. भक्ती शक्तिची निर्मिती करते. प्रार्थना सात्विक आनंद लहरींची निर्मिती करते. पंचक्रोशीत भक्तीचा सुगंध दरवळतो. यातूनच सदृढ पिढी निर्माण होऊन राष्ट्रहित पर्यायाने विश्वहीत साधले जाते. आत्मोन्नती कडून विश्वशांतीकडे, व्दैताकडून अव्दैताकडे, सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्याचा राजमार्ग म्हणजे मंदिर. विश्वकल्याण्याच्या संकल्पनेने प्रेरित होऊन श्री मुक्तादेवी ग्रामविकास संस्था, नारोडी कार्य करण्याचा प्रयत्न करीत आहे.सर्व चैतन्य तामाद्यां विद्यां धीमही । आदि हीच या चराचर विश्वाला आधारभूत असून ती सर्व चैतन्य रूपआहे. संपूर्ण जगताचा आत्मा ही अनंत विक्रमरूपी महाशक्ती आहे. याच महाशक्ती स्वरुप मुक्तादेवीच्या असीमकृपेने व सर्व भक्तांच्या सदिच्छेने मुक्तादेवी मंदिराचा जीर्णोध्दार पूर्ण झाला असून देवीची पुनःप्राणप्रतिष्ठा व कलशारोपण सोहळा मिती फाल्गुन शु. १२ शके १९४५ बुधवार दि. २१/०२/२०२४ रोजी स. ११.४३ वा. संपन्न होत आहे. तसेच या निमित्ताने सकलजनपद विश्वकल्याणार्थ विश्वशांती यागाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडी वेद बोलविले. त्या रेड्याला चास-नारोडीघोडनदी तोरावर तिलांजली दिल्ली. ज्ञानेश्वर व मुक्ताई यांनी नारोडी गावात मुक्काम केला. याच ठिकाणी हे मंदिर बांधले आहे. येथे मुक्ताईने आख्यायिका सांगितली, असे सांगितले जाते. दरवर्षी येथे चैत्र पौर्णिमिला यात्रा भरते. तर, श्रावणात अखंड हरिनाम सप्ताह होतो.