प्रतिनिधी – किशोर ठोसर
ता.१५ फेब्रुवारी २०२४ अटल बिहारी वाजपेयी विचारमंच पुणे जिल्हा संचलित, भारतीय जनता पार्टी आंबेगाव तालुका व अटल वैद्यकीय सहायता कक्ष यांच्या वतीने डॉक्टर मोहन डोळे मेडिकल फाउंडेशन संचलित, मोहन ठूसे नेत्र रुग्णालय नारायणगाव यांच्या माध्यमातून श्री गणेश जयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर वडगाव काशिंबेग (ता.आंबेगाव) या ठिकाणी गुरूवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आले होते. या शिबिराद्वारे मोतीबिंदू शोधून भिंगरोपणाची शस्त्रक्रिया मोहीम, लेझर मशीन द्वारे (फेको) परदेशी भिंग टाकून बिन टाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात करण्याची प्रक्रिया पार पडली. त्याचबरोबर लहान मुलांसाठी विशेष नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया, डोळ्यांच्या मागील पडद्याची (रेटिना) तपासणी व शस्त्रक्रिया, मधुमेह आणि रक्तदाब असणाऱ्या रुग्णांसाठी नेत्र तपासणी व उपचार, तिरळेपणावरील शस्त्रक्रिया, डोळ्यावरील प्लास्टिक सर्जरी, बुबुळाचे आजारावरील शस्त्रक्रिया, लासरू टाक्याची व बिन टाक्याची शस्त्रक्रिया, काचबिंदू उपचार व शस्त्रक्रिया, डोळ्यांच्या पापणी वरील शस्त्रक्रिया इत्यादी सुविधांसाठी सदर शिबिर ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरील बाजूस असलेल्या प्राथमिक उपकेंद्र वडगाव काशिंबे येथे सकाळी १० ते दुपारी ०२ या वेळात पार पडले. या शिबिरामध्ये १५० हून अधिक रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली दरम्यान २१ रुग्णांना मोतीबिंदू आढळून आला.
या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी माजी सरपंच मारुतीनाना विष्णू डोके, दिलीप आवटे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुरेश डोके, राजू कडधेकर, विकास खराडे, सुरेश पिंगळे, अशोक गुजर, संतोष टेके, तुकाराम खंडागळे, मल्हारी क्षिरसागर, तालुका उपाध्यक्ष तुषार तारू, आरोग्य सेविका अर्चना निंबाळकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. आरोग्य दूत सुशांत थोरात, भाजपा आंबेगाव तालुका सरचिटणीस संतोष कडुसकर यांच्यासोबतच डॉक्टर रविंद्र कानडे यांचे या शिबिरात मोलाचे सहकार्य लाभले.