घोडेगाव प्रतिनिधी – सुरंजन काळे
कृषी उत्पन्न बाजार समितीत मंचर येथे आंबेगाव तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या सचिव व संचालक मंडळ यांना संस्थेच्या सक्षमिकरणासाठी केंद्र शासनाने १५२ व्यवसाय सुरू करण्यास मान्यता दिली आहे. संस्थेचे संचालक मंडळ व कर्मचारी यांनी सभासदांच्या हिताचे व्यवसाय सुरू करून संस्था बळकट करावी. यासाठी विविध प्रकारचे अनुदान शासनामार्फत दिले जाईल,” असे आश्वासन महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे यांनी दिली.
यावेळी ते म्हणाले, की कार्यकारी संस्थांच्या गटसचिवांना सेवेचे कायद्याने संरक्षण देण्यासाठी राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुन्हा एकदा केडर स्थापनेसाठी विधिमंडळात विधेयकमंजूर करून घेतले आहे. त्यांच्याच पुढाकारातून राज्यातील सर्व संस्थांचे सचिव व संचालक मंडळ यांना विविध योजनांबाबतचे प्रशिक्षण आयोजित केले आहे.यावेळी पुणे जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, सहायक व्यवस्थापक गिरोश जाधव, सहायक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी, देखरेख संघाचे तालुका अध्यक्ष सखाराम काळे पाटील, कर्ज अधीक्षक अंकुश हिंगे, तालुक्यातील ५९ संस्थांचे सचिव, अध्यक्ष व संचालक मंडळ उपस्थित होते.यावेळी एम.सी.डी.सी चे प्रशिक्षण प्रमुख दिगंबर साबळे व तज्ज्ञ व्याख्याते रमेश बांडे, महाव्यवस्थापक संजय कुमार सुद्रिक यांनी व्यवसायाभिमुख विविध कार्यकारी संस्था काळाची गरज या विषयावर मार्गदर्शन केले.हेमंत जगताप यांनी सूत्रसंचालन केले. विभागीय अधिकारी व्ही. ए. गायकवाड आभार यांनी मानले.