प्रतिनिधि – सुरंजन काळे
आंबेगाव तालुक्यातील वाळुंजवाडी गावामध्ये बैलगाडा शर्यतीच्या दरम्यान टोकन नंबरला लावण्याचे कारणावरून कुणाल खिरड या तरुणास वाळुंजवाडी गावातीलच दहा ते बारा जणांनी बेशुद्ध होत पर्यंत केली जबर मारहाण याबाबतची फिर्याद कुणाल खिरड याचे चुलते दिनेश खिरड यांनी मंचर पोलीस ठाण्यात दिली आहे.
मिळालेली सविस्तर माहिती अशी की, दिनांक 20/07/2024 रोजी आंबेगाव तालुक्यातील वाळुंजवाडी गावातील व आयोजक भीमरावशेठ बाजीराव वाळुंज आणि यात्रा कमिटी अध्यक्ष सतीश जिजाभाऊ शिंदे यांनी श्री गणेश यात्रा उत्सव वाळुंजवाडी ता. आंबेगाव जि. पुणे बैलगाड्यांच्या भव्य शर्यती, ओम साई स्वयंभू मोरया मोटर्स वाळुंजवाडी गावचे उद्योजक भीमरावशेठ बाजीराव वाळुंज यांच्या विशेष सहकार्यातून भव्य निमंत्रित 20 – 20 बैलगाडा शर्यत भरवण्याचे आयोजन केले होते, दिवसभर यात्रा चालू होती मात्र सायंकाळी 04 : 45 च्या दरम्यान घाटामध्ये बैलगाडा शर्यती चालु असताना कुणाल संतोश खिरड याचे बैलागाडयचे टोकनप्रमाणे शर्यत पुर्ण झाली व सदरची बैले घाटातुन वर पळत गेली असताना कुणाल खिरड, राहुल खिरड, आणि सिद्धेश खिरड असे तिघेजण बैल पकडण्यासाठी बैलांचे पाठीमागे पळत असताना कुणाल हा दमल्याने तो पाठीमागे थांबला त्यावेळी वाळुंजवाडी गावातील इसम नामे 1) कमलेश निघोट, 2) प्रथमेश निघोट, 3) हर्शल निघोट, 4) प्रमोद लोंढे, व इतर अनोळखी 6 इसम यांचेमध्ये टोकन नंबरला लावणेचे कारणावरून बाचाबाची झाली. याचा राग मनात धरून त्या सर्वांनी कुणाल खिरड यास लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली व कमलेश निघोट याने त्याचे हातात असलेला पत्र्याचा डबा कुणाल याचे डोक्यात पाठीमागे मारला तसेच हर्षल निघोट याने त्याचे हातातील काठीने कुणाल याचे पाठीवर मारून दुखापत केली. त्यानंतर तेथील असणारे लोकांनी कुणाल यास मंचर येथील सरकारी दवाखान्यात ऍडमिट केले. मात्र कुणाल खिरड हा बेशुद्ध असल्यामुळे पुढील उपचारकामी वैदयकिय अधिकारी मंचर यांनी ससुन हॉस्पीटल येथे घेवुन जाण्यास सांगितले असता कुणाल यास पुढील उपचारकामी सरकारी ॲम्बुलन्स मधून घेवुन गेले आहेत. बेकायदा जमाव जमवून कुणाल यास लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली व कमलेश निघोट पत्र्याचे डब्याने डोक्यात मारून व हातातील काठीने पाठीवर, अंगावर मारून आपखुषीने दुखापत केली आहे. म्हणुन त्यांचे सर्वांचे विरूध्द कायदेशिर फिर्याद मंचर पोलीस स्टेशनला दिली आहे.सदर गुन्ह्याचा तपास मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.अरुण फुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवा. श्री. नंदकुमार आढारी हे करत आहेत.
दरम्यान कुणाल खिरड याचे वडगाव येथील तरुण मित्रमंडळींनी, व स्थानिकांनी आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शासन करावे. तसेच प्रांत अधिकारी व तहसीलदार यांनी बैलगाडा शर्यतीसाठी दिलेली परवानगी तात्काळ रद्द करावी व आरोपींवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात यावे तसेच दिनांक 21 जुलै 2024 रोजी वाळुंजवाडी घाटामध्ये कोणताही बैल पळून न देता घाट बंद करण्याचा आदेश द्यावा, अन्यथा वडगावातील तरुण मित्रमंडळी व कुटुंबीय सदर घाटामध्ये बसून घाट बंद करण्याचा इशारा कुटुंबीयांनी व तरुण मित्रमंडळींनी दिला आहे.