घोडेगाव प्रतिनिधी – सुरंजन काळे
आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडेगाव चे इयत्ता दुसरी व इयत्ता तिसरीचे विद्यार्थी यांनी मायबोली वाचनालय येथे भेट दिली. मायबोली वाचनालय संस्थापिका श्रीमती हिराबाई काळे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना छान छान गोष्टींची पुस्तके वाचावयास दिली व एक छान गोष्ट सांगितली. तसेच मुलांना चॉकलेट दिल्या. माजी मुख्याध्यापिका हिराबाई बोराडे यांनी विद्यार्थ्यांना त्यांनी रचलेल्या कवितांचे वाचन करून दाखवले . विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांच्या जयंती निमित्त विविध गाणी व माहिती सादर केली. विद्यार्थी वाचनालयाला भेट दिल्यामुळे खुश होते. यावेळी श्रीमती हिराबाई काळे यांनी त्यांनी लिहिलेले वाचनाचा छंद हे पुस्तक शाळेतील सर्व शिक्षकांना सप्रेम भेट दिले. यावेळी श्री राजाराम काथेर व श्रीमती सुनिता काठे हे शिक्षक उपस्थित होते.