प्रतिनिधि – सुरंजन काळे, घोडेगाव
कांद्याला सध्या चांगला भाव आल्याने चोरट्यांचीही त्यावर नजर पडली आहे. कांदा शेड मधून दोघा चोरट्यांनी जवळपास दोन गोण्या कांदा लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, घोडेगाव जवळील मौजे तिवलदरा ता. आंबेगाव जि. पुणे येथे फिर्यादी समीर सूर्यकांत काळे (शेतकरी) यांनी 3 एकर क्षेत्रामध्ये कांद्याचे पीक केले होते. त्या शेतातील कांदे काढून चाळी मध्ये ठेवले आहेत. दि. २३ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ०७:३० चे सुमारास फिर्यादी त्यांच्या शेतातील कांद्याच्या बराखी कडे जाते वेळी कांद्याच्या बराखी जवळून दोन इसम त्यांच्या पाठीवर पांढ-या रंगाच्या गोणीमध्ये कहीतरी घेवून जात असल्याचे दिसले. त्यांना फिर्यादी यांनी आवाज दिला असता त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या गोणी तेथेच टाकून पळू लागले म्हणुन शेतकरी यांनी त्यांचे पाठीमागे पळत जावून एका व्यक्तीला पकडले व दुसरा पळून गेला त्यानंतर पकडलेल्या व्यक्तीला त्याचे नाव पत्ता विचाले असता त्याने त्याचे नाव गणपत वसंत वाघ रा कोळवाडी ता.आंबेगाव जि. पुणे असे सांगीतले. त्याचेकडे विचारपूस केली असता त्याने त्याचा मित्र रमेश रण दोघांनी मिळून कांद्याच्या बराखी कडे बोट करून ह्या कांद्याच्या बराखीतून कांदे चोरले आहे असे सांगितले. तेथे टाकलेल्या पांढ-या गोणी उघडून पाहील्या असता त्या प्रत्येक गोणी मध्ये अंदाजे 20 ते 25 किलो कांदे होते म्हणुन त्याला शेतकरी हे कांद्याच्या बराखी जवळ घेवून गेले.
त्यावेळी त्याने कांद्याच्या बराखीचे दक्षिण बाजुला नेवून वरील बाजुची वाकवलेली तारेची जाळी दाखवून याच ठिकानाहून मी व माझा मित्र रमेश रण असे आम्ही दोघांनी कांदे चोरले असल्याचे कबूल केले.त्यानंतर शेतकरी यांनी गावातील पंढरीनाथ मारूती काळे व सुनिल तुळशिराम काळे यांना फोन करुन त्या ठीकानी बोलावून घेतले. ते तेथे आल्यानंतर कांद्यांची चोरी करणा-या इसमांपैकी पकडलेला व्यक्ती गणपत वसंत वाघ याला घेवून पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यासाठी गेले. गणपत वसंत वाघ याने टाकलेल्या एका पांढ-या रंगाच्या गोणीमध्ये अंदाजे 20 किलो कांदे तसेच रमेश रण याने टाकलेल्या एका पांढ-या रंगाच्या गोणीमध्ये अंदाजे 22 किलो कांदे किंमत अंदाजे १३४४/- .सदर गुन्ह्याची दखल घेत गणपत वसंत वाघ व रमेश रण या दोघांविरोधात घोडेगाव पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करुन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास घोडेगाव पोलीस स्टेशन करत आहे.