प्रतिनिधि – दिपाली खिरड
चाकण (ता. खेड) जवळील कातकरी वस्तीवरील शाळकरी मुलांना तसेच तेथील महिलांना वापरण्यायोग्य कपडे, साड्या, ड्रेस ,ब्लॅकेटस यांचे वाटप कातकरी वस्तीवर जाऊन करण्यात आले. पाऊस असतानाही चाकण फांऊडेशनचे समन्वयक शिवाजी होळकर यांच्या सहकार्याने बजाज कंपनीचे श्री . दिलीप गवस साहेब यांच्या सौजन्याने ही कपडे उपलब्ध करण्यात आली.
गणेश पवार व पांढरे साहेब यांनी पुण्याहुन स्वतःच्या वहानाने पाच पिशव्या कपडे आणून ती वस्तीवरील मुलांना व महिलांना वाटप केली. याप्रसंगी फाउंडेशनचे दिलीप आहिरे, रामदास सप्रे , शिक्षक मनोहर मोहरे , कातकरी वस्तीवरील शंकर वाघमारे, गोटूराम मुकणे, दत्ता हिलम, गणेश वाघमारे, तानाजी भोईर, शीतल पवार , गातांजली भोईर तसेच बहुसंख्य आदिवासी मुले उपस्थित होती. कपडे मिळाल्याने मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. यापूर्वीही चाकण फाऊंडेशनकडून येथील विद्यार्थ्यांना दप्तरे तसेच शालेय साहीत्य वाटप करण्यात आले होते .